एल.जी बनसुडे इंग्लिश आणि मराठी मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांची पुणे जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उल्लेखनीय कामगिरी.
इंदापूर : पळसदेव ( ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे इंग्लिश आणि मराठी मिडीयम स्कूल पळसदेव येथे पुणे जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यामध्ये इयत्ता ८ वी
स्वराली सचिन शेलार,आशुतोष संभाजी डोंगरे,श्रेयश रमेश जगताप,
तसेच इयत्ता ५ वीतील यश रमेश जगताप या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरावर घवघवीत कामगिरी करत निवड झाली आहे. त्यांच्या यशाचा गौरव करत संस्थेचे अध्यक्ष हनुमंत लक्ष्मण बनसुडे , उपाध्यक्ष डॉ. शितल शहा, कार्याध्यक्षा सौ. नंदाताई हनुमंत बनसुडे तसेच सचिव नितीन दशरथ बनसुडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक जयश्री काळे, धनश्री मदने, सुवर्णा वाघमोडे ,विद्या पोटे,तेजस्विनी तनपुरे, राहुल वायसे यांचा सन्मान करण्यात केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास विद्यालयाच्या प्राचार्या सौ. वंदना नितीन बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे , उपमुख्याध्यापक सुवर्णा वाघमोडे , विभाग प्रमुख सीमा बाराते ,प्रवीण मदने ,तेजस्विनी तनपुरे, ज्योती मारकड, तनुजा फुगे यांची उपस्थिती लाभली.
सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून, त्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.