प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज शहरातील प्रशांत नगर कानडी रोडचा वार्ड क्रं.04 चा मुख्य रहदारीचा रस्ताच खोदून टाकल्यामुळे या भागातील नागरिकांना वागण्यासाठी तसेच वाहन ये जा करण्यासाठी रस्ताच खोदून टाकल्यामुळे गैरसोय होत आहे.गेली पन्नास वर्षे झाले हा रस्ता आहे यावर नगरपंचायत अंतर्गत रस्ते व नाली बांधकाम बऱ्याच वेळा झाले असून याचे रीतसर बिल सुद्धा गुत्तेदारांनी उचललेले आहे . हा प्रशांत नगरचा मुख्य रस्त्या आहे व तो जवळपास पन्नास वर्षे झाले येथील नागरिकांच्या वापरात आहे. 15 फुट रस्ताच खोदून टाकल्यामुळे या भागातील नागरिकांचे वागण्यासाठी तसेच वाहन चालवताना अतोनात हाल होत आहेत.
मोठी फोर व्हीलर गाडी तर आत, बाहेर जाणे शक्यच राहिले नाही. वकिलवाडी अंतर्गत येणाऱ्या या भागात रमेश आडसकर यांचे निवासस्थान असून त्यांना मानणारा वर्ग या भागात मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या शब्दावर या भागातील रहिवासी प्रत्येक वेळेस नगरसेवक निवडून देत आहेत.
परंतु निवडून आलेल्या नगरसेवकांचे या भागाकडे कायम साफ दुर्लक्ष असते. एकदा का नगरसेवक निवडून आले की पुन्हा ते या भागात ढुंकूनही पाहत नाहीत असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशांत नगरचा मुख्य रस्त्याच खोदून टाकल्यामुळे या भागातील नागरिकांनी पोलिस निरीक्षक , पोलिस स्टेशन केज येथे निवेदन दिले आहे. प्रशांत नगर भागात बहुतांश हिंदू नागरिक असून सदर रस्ता खोदणारा मुस्लिम समाजातील व्यक्ती असल्याने सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते.
विशेष म्हणजे त्याने खरेदी केलेली कागदपत्रे तपासून घेतले पाहिजेत ही कागदपत्रे इनामी जागेची असून यात खरेदी-विक्री बाॅंडवर झालेले आहे विषेश म्हणजे ज्याच्याकडून विकत घेतली आहे त्याच्या नावावर फेरफार नोंद सूद्दा झालेली नसताना त्याने विकलीच कशी हे पण प्रशासनाने पाहिले पाहिजे. यात पण मोठे गौडबंगाल आहे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.तरी हा खोदलेला रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी समस्त प्रशांत नगर भागातील नागरिकांनी केली आहे. केज नगरपंचायतीने सिओ , नगराध्यक्षा तसेच गटनेते व प्रशासनाने देखील तात्काळ हा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.