समीर भुजबळ अ.भा.म.फुले समता परिषदेची संघटनात्मक आढावा बैठक
नंदुरबार(प्रतिनिधी)-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्वतंत्र नंदुरबार जिल्हा संघटनात्मक आढावा बैठक कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली, प्रदेश कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, रविभाऊ सोनवणे, संपर्क प्रमुख अनिल नळे यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली.
बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासह तालुकानिहाय संघटनेच्या रचनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. संघटनेच्या सक्रीय कार्यकर्त्यांनी तालुक्यातील प्रत्येक गाव पातळीपर्यंत जाऊन समाजात जातवार जनगणना संदर्भात जनगणनेची आवश्यकता, त्याचे लाभ, लोकप्रतिनिधीत्व आणि त्याचे महत्त्व, बहुजन समाजापुढील आव्हाने, शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार खोलवर रुजवण्याची गरज या संदर्भात वक्त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
चर्चेत नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, सरचिटणीस रामकृष्ण मोरे, कार्याध्यक्ष मधुकर माळी, माजी नगरसेवक मोहन माळी, जिल्हाअध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी ऑर्गोनायजेशन एजाज बागवान, तालुकाध्यक्ष गणेश माळी, रविंद्र बेलदार यांनी सहभाग घेऊन संघटनात्मक अडी-अडचणी आणि विधायक कार्याबाबत आपले अभिप्राय व्यक्त केले.
उपस्थितीत माजी नगरसेवक ऍड.प्रकाश भोई, विनोद अहिरे, हिरालाल माळी, नरेंद्र जाधव, जगदिश माळी, जयसिंग चौधरी, विपुल रोकडे, पुंडलिक माळी, विक्रम वसावे, महेश माळी, ऍड.अविनाश माळी, डी.डी.महाजन, संजय माळी, बापू महाजन, सतिलाल नीझरे, दिनेश महाजन, सुर्यकांत जाधव, प्रविण वाघ, देवेंद्र माळी, संजय महाले, महेश खैरनार, पंढरीनाथ महाजन, यादव खैरनार, रविंद्र माळी, भालचंद्र खैरनार, ज्ञानेश्वर महाजन, प्रकाश माळी, मनोज वारुळे, हेमंत माळी, भिमराव वारुळे, प्रविण अकवारे, राहुल महाजन, राजेंद्र चौधरी, यशराज अकवारे, रवींद्र देवरे आदींचा समावेश होता.
मा. संपादक सो हि प्रेसनोट आपल्या लोकप्रिय दैनिकास प्रसिद्धीस द्यावी हि विनंती
आपला नम्र
इंजिनियर रामकृष्ण मोरे