एरंडोल (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व तालुका किसान सेल यांच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी एरंडोल शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच पद्मालय रस्त्यावरील बिल वस्तीतील सुमारे 300 लहान मुलांना फळे व बिस्किटांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला.
या उपक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून किसान सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. ईश्वर पाटील (जळगाव), तालुका अध्यक्ष अमित दादा पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. सुरेश पाटील, तालुका किसान सेल अध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत भाई पाटील, शहराध्यक्ष गोरख भाऊ चौधरी, अॅड. दिनकर पाटील, श्री. मुकुंद ठाकूर, किशोर पाटील, ईश्वर भाऊ सोनार, किशोर भाऊ पाटील, कलीम शेख, शाहरुख भाई पठाण, अभयसिंग पवार, शिवा पवार, बापू महाजन, जगदीश महाजन यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सुयोजित पद्धतीने पार पडले असून स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन या उपक्रमांतून घडल्याचे उपस्थितांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका व शहर कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे केले.