shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आर्यवैश्य महासभेच्या वतीने आज गुणवंत विद्यार्थी सत्कार व अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन!!


==========================
प्रकाश मुंडे /बीड जिल्हा प्रतिनिधी:-                           शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आर्यवैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थी व समाजातील जेष्ठ नागरिकांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा बीडच्या वतीने आज रविवार रोजी करण्यात आले असुन या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महासभेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत महाजन व सचिव अजय रुद्रवार यांनी केले आहे.
केज येथील श्रीराम मंगल कार्यालय याठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार हे राहणार आहेत तर महासभेचे महासचिव गोविंद बिडवई , अमृत चे मराठवाडा विभागीय व्यवस्थापक सुशांत देशपांडे , डॉ सतिष साळुंके , यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे तरी या कार्यक्रमास बीड जिल्ह्यातील समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष वैभव झरकर , कोषाध्यक्ष बालाजी बासटवार , या सोहळ्याचे प्रोजेकट  चेअरमन प्रमोद बिडवई , सुहास चिद्रवार यांनी केले आहे.
close