शिर्डी प्रतिनिधी |
👉 अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समिती व ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशन लघुउद्योग विकास संघटनेतर्फे सन्मान
शिर्डी येथे 20 जून रोजी साई पालखी निवारा येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात, सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिर्डीचे नामांकित सामाजिक कार्यकर्ते श्री नानासाहेब शिंदे पाटील यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२५-२६ ने गौरविण्यात आले.
✅ हा सन्मान समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रदीप पा. खंडापूरकर बाबा व अँड. राणीताई स्वामी यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन करण्यात आला.
✅ या सोहळ्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
✅ कार्यक्रमाचे आयोजन सौ. नयनाताई शिरसाठ, मनोज दुशिंग, रमेश साबळे, बाळासाहेब शिरसाठ, सायली बनसोडे, रुपाली मोलाचे, सुरेंद्र महाले, पंकज पाटील, बाबासाहेब पगारे, सौ. मायाताई आरणे यांनी केले.
या यशाबद्दल नानासाहेब शिंदे पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

