शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
महाराष्ट्र राज्य एन जी ओ फेडरेशन च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाली असून निवडिचे पत्र महाराष्ट्र राज्य एन जी ओ फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री दिपकजी आगळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री अण्णासाहेब बनसोडे यांना निवडिचे पत्र देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य एन जी ओ फेडरेशन हि संघटना राज्यात सामाजिक संस्थांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. जवळपास तीन लाखांच्या आसपास राज्यातील सामाजिक संस्था ह्या महाराष्ट्र राज्य एन जी ओ फेडरेशन च्या सलग्न आहेत. हजारो संस्थांना सी एस आर फंड केंद्र सरकार व राज्य सरकार चे अनेक प्रस्ताव संस्था ना मंजुरी मिळुन देण्याचे काम फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक आगळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुर झाले आहेत. यावेळी अण्णासाहेब बनसोडे हे महाराष्ट्र राज्य एन जी ओ फेडरेशन मध्ये प्रदेश महासचिव पदावर काम करीत असल्याने त्यांच्या कामाची दखल व जबाबदारी घेऊन फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री. दिपक आगळे पाटील यांनी त्यांना महाराष्ट्र राज्यातील सर्व सामाजिक संस्था ना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष पदी अण्णासाहेब बनसोडे यांची नियुक्ती केली आहे नियुक्ती बदल बोलताना बनसोडे म्हणाले की आगामी काळात राज्यात श्री दिपक आगळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्याती संपूर्ण सामाजिक संस्था एका छताखाली आणुन ज्या तळागाळातील संस्था ना निधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अण्णासाहेब बनसोडे हे स्वता पत्रकार असून अनेक सामाजिक प्रश्नाची दखल घेऊन समाज माध्यमातून मांडण्याचा आले आहेत. निवडीबद्दल, संस्थापक अध्यक्ष.. श्री दिपक आगळे पाटील, प्रदेश अध्यक्ष श्री अधिकराव जगताप.. संघटन प्रमुख. श्रीकृष्ण मुरकुटे पाटील. प्रदेश कार्याध्यक्ष. श्री अभिषेक पटारे पाटील. मा प्रदेश अध्यक्ष. नितीन दांडगे सर. प्रदेश संघटक कार्याध्यक्ष. श्री राजकुमार मुंढे सर जिल्हा अध्यक्ष वसंतराव कर्डीले. पा. श्री विजयराव चेमटे.. ऋषिकेश इवळे. ऍड राजेंद्र वाबळे, अॅड. अर्जुन काळे व इतरांनी अभिनंदन केले आहे.

