shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईबाबांच्या नगरीतच प्रचंड फसवणूक! – श्री साईबाबा संस्थानचे चार कर्मचारी निलंबित, कोट्यवधींचा गुंतवणूक घोटाळा उघड!

शिर्डी एक्स्प्रेस विशेष वृत्तसेवा

शिर्डी प्रतिनिधी :-

भक्तांच्या श्रध्देचे केंद्र असलेल्या साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांकडूनच घोर विश्वासघात!

शिर्डीतील जगप्रसिद्ध श्री साईबाबा संस्थानवर पुन्हा एकदा काळी छाया पडली आहे. कोट्यवधी रुपयांचा गुंतवणूक फसवणूक घोटाळा उघडकीस आल्यानंतर संस्थानच्या चार कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. ‘ग्रो मोअर’ या बनावट गुंतवणूक योजनेतून राज्यभरातील निष्पाप गुंतवणूकदारांना गंडवण्यात आले, तर यामागे संस्थानच्या आतल्या लोकांचीही हातमिळवणी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे!



💥 कोण आहेत हे आरोपी?
राहाता पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार भूपेंद्र राजाराम सावळे, सुबोध सावळे, संदीप सावळे आणि भाऊसाहेब थोरात यांनी ग्रो मोअर कंपनीच्या नावाखाली मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली. या घोटाळ्याचा मास्टरमाईंड भूपेंद्र सावळेला पोलिसांनी बेड्या ठोकून २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवले आहे. मात्र, इतर आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू आहे.

🚨 संस्थानच्याच कर्मचाऱ्यांनी रचला कट!
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींमध्ये चौघेही साईबाबा संस्थानचे कर्मचारी असल्याने या प्रकरणाने प्रचंड खळबळ माजवली आहे. भक्तांच्या श्रध्देवर चालणाऱ्या या संस्थेतूनच सहकाऱ्यांना फसवणुकीत ओढून निधी लाटला गेला! या गंभीर गैरप्रकाराची माहिती समोर आल्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गाडीलकर यांनी चौघांवर निलंबनाची कारवाई करण्याचा तातडीने निर्णय घेतला आहे.

🔥 शिर्डीत संतापाचा उद्रेक!
या घोटाळ्यामुळे शिर्डीतील नागरिक, गुंतवणूकदार व साईभक्तांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. श्रध्दास्थान असलेल्या संस्थानच्या आंतरिक कर्मचाऱ्यांकडूनच गुन्हेगारी व फसवणूक होणे हे साईबाबांच्या नावालाच कलंक असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

🛑 आता पुढे काय?
राहाता पोलिसांनी आरोपींच्या मागावर धडक मोहीम सुरू केली असून, फरार असलेल्या सुबोध सावळे, संदीप सावळे व भाऊसाहेब थोरात यांच्या अटकेसाठी शोध मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान कसे भरून निघणार, संस्थानची प्रतिमा पुन्हा कशी उभी राहणार याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

👉 हा घोटाळा आणखी मोठा आहे का? आणखी कोण कोण यात सामील आहे?
या प्रकरणात आणखी मोठे बड्या माशांचे नाव समोर येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिर्डी एक्स्प्रेस या घोटाळ्याचा पाठपुरावा करणार असून, आणखी धक्कादायक खुलासे लवकरच समोर आणणार आहे!


close