shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवळाली प्रवराला स्वतंत्र पोलीस ठाणे लवकरच; पाठपुराव्याला यश – आप्पासाहेब ढूस

देवळाली प्रवरा, 21 जुलै –

देवळाली प्रवराच्या स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी दिली.

ढूस म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची ही मागणी प्रलंबित होती. प्रहार जनशक्ती पक्ष, शिवसेनेचे सुनीलभाऊ कराळे, देवळाली प्रवरा हेल्प टीमचे माजी सनदी अधिकारी दत्ता कडू आणि अनेक नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर हा पाठपुरावा यशस्वी होत असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.”


📌 मुख्य घडामोडी

  • पावसाळी अधिवेशनात 18 जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात नव्या पोलीस ठाण्यांचा मुद्दा उपस्थित
  • जिल्हा पोलीस अधीक्षकांनी 22 जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश उपविभागीय पोलिस प्रमुखांना दिले.

  • टाकळी ढोकेश्वर, खरवंडी कासार, बोधेगाव, केडगाव, सावेडी, देवळाली प्रवरा, कोतुळ समशेरपूर आदी ठिकाणांसाठी नवी पोलीस ठाण्यांची मागणी
  • राहुरी पोलीस ठाण्यावर वाढता भार कमी करण्यासाठी देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस स्टेशनची गरज

देवळाली प्रवरा परिसरातील वाढती लोकसंख्या व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज होती. राज्य सरकारने ही मागणी गांभीर्याने घेतली असून अंतिम मंजुरीनंतर गुन्हेगारीवर आळा बसेल व कायदा-सुव्यवस्था बळकट होईल.

“मात्र, आजवर साधे पत्रही न देणारे काहीजण आता श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील, पण खरी मेहनत केलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांचे आभार मानतो,” असे ढूस यांनी सांगितले.

शेवटी ढूस यांनी राज्य सरकारने देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याला लवकरात लवकर अंतिम मान्यता द्यावी, अशी विनंती केली.


close