शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
राजकीय बातमी
शिर्डीत राजेश शर्मा ज्येष्ठ कार्यकर्ता सेल शहर अध्यक्ष शिर्डी यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी-शिरडी शहराचा अविस्मरणीय “नवनियुक्त पदाधिकारी नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम” नामदार मा.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमस्थानी नामदार विखे साहेब यांचे शुभहस्ते गोमातेचे पूजन करून “गोसेवा दिन साजरा” करण्यात आला. शिर्डीत राजेश शर्मा जेष्ठ कार्यकर्ता सेल शहर अध्यक्ष शिर्डी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या सह संयोजक पदी रामनाथ हरिभाऊ वर्षे व भाऊसाहेब रामजी राहिज यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य पदी संजय विठ्ठल महाजन, नंदकिशोर विजय राजगिरे, प्रभाकर जाधव, राधाकिसन फकीरा शेटे, कचरूनाना सोन्याबापू वारुळे, धनसिंग देवसिंग पाटील, राजेंद्र हरिभाऊ गोंदकर, सुभाष सिद्धप्पा याद्गुडे, तान्हाजी लक्ष्मण औचर, मुनेश सवाराम राठोड, ज्ञानेश्वर सदाशिव वाकचौरे, प्रविण (बंडू) अंबादास गोरक्ष, सुधीर नंदकिशोर चौधरी, दशरथ सखाराम बंदरकर आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
नुकत्याच शिर्डी येथे झालेल्या पदग्रहण समारंभामध्ये शिर्डीतील सर्व कार्यकारणी यांना नियुक्तीपत्र देऊन या सर्व पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ना. राधाकृष्ण विखे पा,मा. खा. सुजय विखे. पा, भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन दिनकर, माजी जिल्हाध्यक्ष, राजेंद्र गोंदकर, जेष्ठ नेते ज्ञानेश्वर (आबा) गोंदकर, प्रथम नगराध्यक्ष कैलास (बापु) कोते, माजी उपनराध्यक्ष अभय शेळके, राहता मंडळ अध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर, भाजपा शहर अध्यक्ष रविंद्र (तात्या) गोंदकर यांनी स्वागत केले आहे. ना. राधाकृष्ण विखे पा.व मा खा. डॉ सुजय विखे पा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याच्या इच्छा व्यक्त केल्या आहेत. यां निवड झाल्याने त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे.