इंदापूरचे आमदार शेतकरी पुत्र दत्तात्रय भरणे हे कृषी मंत्री झाल्याबद्दल शेतीतील फळे देऊन तेजपृथ्वी ग्रूपच्या वतीन त्यांचा आगळा वेगळा सन्मान.
इंदापूर: इंदापूर तहसील कार्यालय येथे तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिता खरात यांनी शेतातील वेगवेळी एक एक फळे नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री झाल्याबद्दल इंदापूरचे आमदार व राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांना देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी तेजपृथ्वी ग्रुपचे विशाल म्हेत्रे, तानाजी हेगडकर, ओंकार सुतार, व ईतर पदाधिकारी उपस्थित होते .
---------------------------
आपण शेती क्षेत्रातील कारखान्याचे संचालक,चेअरमन तसेच पुणे जिल्हा बँक, जिल्हा परिषद, वेगवेळी मंत्री पदे या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले आहेत.आपण एक आगळे वेगळे कृषी मंत्री माझ्या शेतकरी राजाचे शेतकरी राजे ठराल - तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिता खरात.