शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,
दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार ता. ०३/१२/२०२५
राहुरी : राहुरी तालुक्यातील सडे येथील ओंकार सुनील बनकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात भव्य यशाची नवी उंची गाठली आहे. प्रतिष्ठित भारतीय विज्ञान शिक्षण अनुसंधान संस्था (IISER), पुणे येथे प्रा. डॉ. रामकृष्ण जी. भट यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्र विषयातील संशोधन पूर्ण करून त्यांनी नुकतीच ‘विद्यावाचस्पती’ (पी.एच.डी.) पदवी प्राप्त केली आहे.
डॉ. बनकर यांनी यापूर्वीही आपल्या गुणवत्ता व मेहनतीचा ठसा उमटवत सीएसआयआर–नेट या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत संपूर्ण भारतात ४६वा क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला होता. तसेच ते आयआयटी–गेट परीक्षेतही यशस्वी झाले आहेत. त्यांचे पदवी शिक्षण कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, राहुरी येथे तर पदव्युत्तर शिक्षण अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर येथे झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल राहुरी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. संभाजी पठारे, प्रा. गंगाधर रोहोकले, प्रा. दादासाहेब वाकचौरे, प्रा. श्रेयस पानसंबळ तसेच अहमदनगर महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. नोयल पारगे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेश ताक, वरिष्ठ प्रा. संदीप रोहोकले, डॉ. ज्ञानेश्वर गायकवाड तसेच इतर प्राध्यापकांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
डॉ. ओंकार बनकर यांच्या यशाबद्दल त्यांच्या सडे गाव आणि राहुरी तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कामगिरीमुळे परिसरात अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

