shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री अंबरीश महाराज टेकडीवर झाला भव्य वृक्षारोपण सोहळा.

श्री अंबरीश महाराज टेकडीवर झाला भव्य वृक्षारोपण सोहळा

उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या वाढदिवसा निमित्त जपली सामाजिक बांधिलकी..

अमळनेर-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दिनांक 23 रोजी सकाळी 10 वाजता शहरातील श्री अंबरीश महाराज टेकडीवर भव्य वृक्षारोपण सोहळा पार पडला.

         माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार सामाजिक बांधिलकी जपत अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे हा भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.निसर्ग संवर्धन ही काळाची गरज असून, पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे, ही जबाबदारी म्हणूनच हा उपक्रम हाती घेतला आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील यांनी यावेळी केले.या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच महिलामंडळ मोठ्या संख्येने व मोठ्या उत्साहाने उपस्थित झाले होते.

श्री अंबरीश महाराज टेकडीवर झाला भव्य वृक्षारोपण सोहळा

close