shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकरी व दिव्यांगांच्या मागण्यांसाठी संगमनेरमध्ये चक्काजाम आंदोलन, हायवेवर पत्त्यांचा खेळ खेळून कृषिमंत्र्यांना लक्ष्य!..!

संगमनेर प्रतिनिधी :

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, शेतमालाला हमीभाव, विधवांना न्याय व दिव्यांगांना दरमहा ₹६,०००/- मानधन यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने २४ जुलै रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. संगमनेर बसस्थानकासमोरील पुणे-नाशिक हायवेवर हे आंदोलन मोठ्या उत्साहात पार पडले.


आंदोलनकर्त्यांनी हायवेच्या मध्यभागीच पत्त्यांचा खेळ खेळत कृषिमंत्र्यांकडे उपरोधिक संदेश पोहोचवला. उपस्थित शेतकरी व दिव्यांग बांधवांचा रोष तीव्र स्वरूपाचा होता.

आंदोलनाचे नेतृत्व व मागण्यांचे निवेदन

  • आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे संगमनेर तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात,
  • शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे शिवश्री राहुल ढेंबरे पाटील,
  • दिव्यांग सारथी संघटनेचे विनायक दाभोळकर यांनी केले.
  • शेतकरी व दिव्यांगांच्या व्यथा मांडत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

आंदोलनात उपस्थित मान्यवर

या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी व दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवला. त्यांच्यासोबत युवानेते अभिजीत दिघे, गणेश शेळके, निलेश थोरात (चेअरमन), संभाजी काळे (दिव्यांग संघटना उपाध्यक्ष), जालिंदर जाधव, हौशीराम मिंडे (शिवप्रतिष्ठाण राज्य संघटक), शिवनाथ नाईकवाडी (जिल्हा संघटक), गणेश श्रीराम (तालुकाध्यक्ष), जालिंदर गुळवे (तालुका उपाध्यक्ष), तुषार ढेंबरे (तालुका संघटक) यांसह तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाचा बंदोबस्त

चक्काजाम आंदोलनादरम्यान महाराष्ट्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हायवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

आंदोलनकर्त्यांनी सरकारकडून तातडीने मागण्यांची पूर्तता करण्याची इशारादायक भूमिका स्पष्ट केली. मागण्या न मानल्यास पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.


close