shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केले शिबिर आयोजित



*नेत्रसेवक बबन शेळके मित्र यांचे काम युवकांना प्रेरणादायी न भूतो न भविष्य असे सलग नॉन स्टॉप 250 शिबीरे आयोजित करून 14000 जणांना दिले नेत्र

शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन )
 सामाजिक बातमी

सर्व सामान्य  गोरगरीब  अहिल्यानगर पासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चिचोंडी पाटील या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्र हा प्रगतीपथावर नेऊन ठेवलेला आहे, महाराष्ट्रामध्ये विकास कामांची गंगा वाहून आणली. असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बबनराव शेळके मित्र मंडळ आयोजित 250 वे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर बुधरानी के.के.आय हॉस्पिटल पुणे आणि भारतीय युवक संघ संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले.  या शिबिराचा 107 नेत्र रुग्णांनी लाभ घेतला असून यातील 67 नेत्र रुग्णांवर के.के. आय. हॉस्पिटल पुणे या ठिकाणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन मार्केट कमिटीचे मा़ संचालक बाजीराव हजारे,यांनी केले तर शिबिराच्या अध्यक्षस्थानी युवा नेते शरद भाऊ पवार हे होते.भाजपा पंचायत राज अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संजय कदम, सामाजिक कार्यकर्ते शहाजी गोरे, भाऊसाहेब हजारी, दीपक हजारे, पांडा वाडेकर, प्रभाकर हजारे, मा. सरपंच तथा भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष अर्चनाताई चौधरी, सुभाष दोघोले,दिगंबर फाळके, धोंडीराम आगलावे,दत्तू माळी,संकेत भिंगारदिवे, संजय दानवे,युवराज हजारे, युवराज देवकर, आदी या शिबिरासाठी उपस्थित होते. या शिबिराचे सूत्रसंचालन शिबिर आयोजक नेत्रसेवक तथा भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक, उपाध्यक्ष, बबनराव शेळके यांनी केले. तर प्रस्तावना आबासाहेब वाडेकर यांनी केली.शिबिर आयोजक बबनराव शेळके व त्यांच्या मित्रमंडळींन विषयी थोडसं सांगायचं म्हटलं तर, अनेक व्यक्ती उल्लेखनीय काम करीत असतात, यात काही जणांची दखल घेतली जाते, परंतु काही जण काम करूनही त्यांच्या कार्याची कोणी दखल घेत नाही,अशा सामाजिक कार्यकर्त्याला कधी प्रसिद्धीची पैशाची हाव नसते,यांचे ज्वलंत उदाहरण द्यायचे झाले तर अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील सामाजिक कार्यकर्ते तथा नेत्रसेवक म्हणून संबोधले जाणारे बबनराव उर्फ सिताराम यशवंत शेळके. हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत,ते चिचोंडी पाटील नगर परिसरामध्ये पेंटिंगचा व्यवसाय करतात.

 या कामातून वेळ काढून  सामाजिक भावनेतून बबन शेळके आणि त्यांचे मित्र मंडळ के.के.आय हॉस्पिटल पुणे आणि भारतीय युवक संघाच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करतात.  तसे पाहायला गेलो तर स्वतःचे मुलं स्वतःच्या आई-वडिलांना सांभाळत नाहीत परंतु  शेळके आपल्या मित्रांना बरोबर घेऊन या वयोवृद्धांची सेवा करत आहे.या पाठीमागचा कुठलाही हेतू त्यांच्यासमोर नव्हता, वैयक्तिक आणि घरचे काम धंदा बंद करून शिबिर आयोजित करीत आहे म्हणून  अनेक जण टिंगल टवाळी करायचे, परंतु त्यांनी आपले वयोवृद्धांची सेवा करण्याचे कार्य पुढे चालू ठेवले, शिबिराच्या वेळी अनेक वयोवृद्धांना  शिबिरामध्ये येताना चाचपडत यावे लागते, परंतु जाताना ते आनंदाने नाचत जात होती, त्यांचा आनंद हा गगनाला भिडत होता त्यांच्या आनंदाला कुठलं मोल नव्हतं हे पाहून खरोखरच मनस्वी आनंद वाटतोय असेही शेळके यावेळी म्हणाले. आज खासदार, आमदार,मंत्री, मोठमोठाले उद्योजक सुद्धा सलग आपलं काम धंदा सोडून 22 -22 वर्ष सामाजिक क्षेत्रात प्रत्येक महिन्याला शिबिर किंवा सामाजिक कार्यक्रम खर्चाने घेऊच शकत नाही आणि घेणारही नाहीत,परंतु काही वर्षांपूर्वी आर्थिक परिस्थिती बेताची असून सुद्धा शेळके यांनी हे शिबिर चालू करून आजपर्यंत नॉनस्टॉप 250  मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे कुठलाही स्वार्थ न ठेवता चालू ठेवली,14000 पेक्षा जास्त नेत्र शस्त्रक्रिया या शिबिरांच्या माध्यमातून झालेली आहे जवळजवळ २ तप सामाजिक कार्याची चळवळ त्यांनी चालू ठेव़ली, त्यांच्या या निस्वार्थपणे चाललेल्या सेवेचे बबन शेळके व त्यांच्या मित्रमंडळींचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे उद्घाटन समयी मार्केट कमिटीचे मा. संचालक बाजीराव हजारे म्हणाले.                 एकीकडे तरुण पिढी व्यसनाधीन बनत चालली असताना,मोबाईलच्या दुनियेत व्यस्त झाली असताना दुसरीकडे  आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने, निस्वार्थपणे काम करताना दिसत आहेत, समाजकार्याचा वसा घेऊन सामाजिक क्षेत्रात काम करताना दिसत आहेत  नगर तालुक्यातील बबन शेळके यांनी सुरुवातीच्या काळात अहिल्यानगर शहरामध्ये पेम्प्लेट छापायचे, 10-12 किलोमीटर पर्यंत खेडोपाडी सायकलवर जाऊन पेम्प्लेट वाटून शिबिराची पब्लिसिटी करायचे पुण्याच्या के. के. आय हॉस्पिटलचे मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया आयोजित केले आहे, तुम्ही या शिबिरासाठी डोळे चेक करण्यासाठी या अशी माहिती शेळके वयोवृद्धांना देत असत आणि देतात. अनेकजन सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवूण घेणारे  वर्षातून दोन-तीन शिबीर ठेवतात, मीडियावर चॅनेलवर मोठा गाजावाजा केला जातो,परंतु गेल्या २२ वर्षापासून बबन शेळके आणि त्यांचे मित्र मंडळ भारतीय युवक संघ आणि बुधरानी हॉस्पिटल पुणे यांच्या माध्यमातून या शिबिरांच सातत्य ठेवून आज पर्यंत २५० शिबीरांची मालिका चा़लुच ठेवली.आल्यानंतर या रुग्णांना एक प्रकारे नवीन दृष्टी प्राप्त होत आहे त्यांच्या जगण्याचा आनंद द्विगुणित होणार आहे ग्रामीण भागात गरीब कुटुंब असते,परिणामी अनेकांना दिसण्यावाचून अंथरुणाला खेळून राहावे लागते, जाण्या येण्यासाठी काहींना दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो,अशा परिस्थितीत भारतीय युवक संघाने वयोवृद्धांना आधार दिला, , आणि नेत्र शिबिरांचा लहान मुलांपासुन वयोवृद्धांपर्यंत अनेक जण लाभ घेत आहेत. आजपर्यंत अनेकांना फायदा झाला आहे, भारतीय युवक संघ आणि बबन शेळके मित्र मंडळाचे स्वयंसेवक निस्वार्थपणे शिबिरासाठी गेल्या २२ वर्षापासून राबत आहेत. सेवा करत आहेत. नेत्र शस्त्रक्रियेसाठी  वृद्धांना प्रवृत्त करतात, आज नेत्र शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयांमध्ये किमान ८ ते ९ हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो या ठिकाणी सर्व उपचार मोफत केले जातात,तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी निवड केल्यानंतर पुण्याच्या बुधरानी के. के. आय हॉस्पिटलमध्ये  सर्व पेशंटला घेऊन जातात, ऑपरेशन झाल्यानंतर डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून काळे चष्मे,औषधे मोफत दिले जातात, आज पर्यंत जवळपास ८  ते  १० कोटी पेक्षा जास्त खर्च सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा या भारतीय युवक संघ व बबन शेळके मित्र मंडळामुळे वाचला आहे आज कुणी कुणालाही १ रुपये देत नाही परंतु एवढं मोठं सामाजिक कार्य त्यांनी उभ केले, हे शिबिर यशस्वी करण्यासाठी  शेळके यांना लोकमान्य पतसंस्था संचालक अनिल शेलार, आबासाहेब वाडेकर, ग्रा.प. सदस्य ज्ञानेश्वर ठोंबरे, लोकमान्य पतसंस्थेचे सचिव गणेश इंगळे,प्रकाश तनपुरे धोंडीराम आगलावे, दत्तात्रय शेळके सर,सचिन इंगळे,विश्वास इंगळे, हमीद शेख,बशीर शेख, आसाराम शेलार, लोकमान्य पतसंस्था संचालक दत्तात्रय कोकाटे पोस्टमन, युवराज देवकर, महेश वाटाडे,अतुल पवणे, संतोष शेळके, अशोक जाधव,महादेव बोरुडे,साधु दिलवाले,उद्धव हजारे, व ज्ञात अज्ञात अनेक ग्रामस्थांनी सहकार्य केले. या सर्वच मित्रमंडळींची मी ग्रामपंचायत चिचोंडी पाटील समस्त ग्रामस्थ चिचोंडी पाटील पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने बबन शेळके मित्र मंडळींचे स्वयंसेवकांचे  मनापासून धन्यवाद मानतो आणि भारतीय युवक संघ बबन शेळके मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांन आपले सामाजिक चळवळअसेच पुढे चालू ठेवावी, अशा त्यांना शुभेच्छा देतो, असे शिबिराच्या अध्यक्ष स्थानावरून युवा नेते सरपंच शरद भाऊ पवार यांनी  कौतुक केले. आणि या सगळ्यांना सहकार्य निश्चित करू असेही ते यावेळी म्हणाले यावेळी हॉस्पिटलचे कर्मचारी, आलेल्या पाहुण्यांचे आभार ग्रा.प. सदस्य ज्ञानेश्वर ठोंबरे,दीपक हजारे  यांनी मांनले.
close