shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मल्टीस्टेट मध्ये बुडालेल्या खातेदारांच्या आशा पल्लवीत , खासदार रजनीताई पाटील यांचे मानले आभार!!

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-

दिल्ली येथे केंद्रीय  गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मल्टी स्टेट बँकेच्या घोटाळ्या विषयीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी होऊन खासदार सौ.रजनी ताई पाटील यांनी मल्टी स्टेट बँकेच्या गैरकारभाराने आर्थिक नुकसान झालेल्या व जीवन संपवलेल्या खातेदारांच्या, ठेवीदारांच्या मदतीसाठी परखडपणे भूमिका मांडली .याविषयी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली. 




जलद गतीने चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करून बाधित खातेदारांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन बैठकीचे अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा आणि चौकशी समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खासदार सौ.रजणीताई पाटील यांना दिल्यामुळे ठेवीदार व खातेदार यांच्या अशा पल्लवी झाल्या असून त्यांनी खासदार सौ.रजनीताई पाटील यांचे आभार मानले आहेत.

close