कनिष्ठ अभियंता यांच्या वर कठोरपणे कार्यवाही करण्यात यावी अन्यथा महावितरण कार्यालया समोर आमरण उपोषण करणार - मुबशीरोदीन खतीब..!!
प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज येथील पत्रकार एम.एम.खतीब यांनी महावितरणच्या शाखा अभियंता यांच्या हीटलरशाही आणि गलथान कारभाराला केज सह तालुक्यातील नागरीक त्रस्त झाले आशा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती .याच बातमीचा मनात राग धरून २९ ऑगस्ट२०२५ रोजी कळंब- रोड येथील पत्रकार खतीब यांच्या कार्यालयासमोर येऊन कनिष्ठ अभियंता श्रीमती शितल सय्यद ह्या आल्या व मला म्हणाल्या की,तु माझी बातमीच्या माध्यमातून बदनामी केली आहे तुला फार मोठी किंमत चुकवावी लागेली मी आता तुला सोडणार नाही.
माझ्या पदाचा व अधिकाराचा वापर करून तुझ्या कडून दोन लाख रुपये वसूल करून तुझ्यावर कसल्याही प्रकारच्या खोट्या गुन्ह्यात तुला आडकविणार आशी मला धमकी दिली, या आगोदर मी मोठ्या मोठ्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल केलेले आहे तर तु एक मामुली पत्रकार काय चीज आहे.
तु लावलेल्या बातमीमुळे माझी बदनामी झाली मी पण तुझी आशीच बदनामी करणार तुझ्या सारखे लय पत्रकार बघीतले तुमच्या सारख्या चिल्लर पत्रकाराघी औकात नाही, मला खेटण्याची तुला किंमत चुकवावी लागेल,मला अपमानास्पद भाषा वापरून मला व माझ्या पत्रकारितेला अपमानीत केले.
कनिष्ठ अभियंता श्रीमती शितल सय्यद ह्या केज येथे आल्यापासून सतत केज शहरात व ग्रामीण भागातील ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देत आहेत.
आशयाची माहीती मी आपलेला वेळोवेळी मोबाईल द्वारे माहिती दिली व दैनिकांत प्रसारीत झालेल्या बातम्या आपणास पाठवल्या होत्या. त्या अनुषंगाने आपणही सदर प्रकरणी त्यांना जाब विचारला म्हणून त्यांनी माझ्या समवेत बोलून दाखवले आहे.सदर प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोन दिवसांत दोषी कनिष्ठ अभियंता यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा २ सप्टेंबर२०२५रोजी केज येथील महावितरण कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे तरी यांची आपल्या स्तरावर नोंद घ्यावी.
पत्रकार यांच्या विषयी अपशब्द वापरल्या प्रकरणी व पत्रकारीतेच्या अवमान करून मला धमकी दिली बदल व "गोल टोपी" वाला पत्रकार म्हणून स्वतःच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप वर स्टेटस ठेऊन माझा व समस्त मुस्लिम समाजातील लोकांचा व पत्रकार बांधवांचा आणि माझ्या पत्रकारितेचा आवमान कनिष्ठ अभियंता श्रीमती शितल सय्यद यांनी केला आहे.
तरी वरील होणाऱ्या परीणामास कनिष्ठ अभियंता श्रीमती शितल सय्यद आपण जबाबदार रहाताल अशा आशयाचे निवेदन उर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य अभियंता साहेब, महावितरण लातुर, कार्यकारी अभियंता अंबाजोगाई , तहसीलदार साहेब केज, पोलिस स्टेशन केज,उपअभियंता साहेब महावितरण केज या निवेदन देण्यात आले आहे.
जर सदर प्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर २ सप्टेंबर रोजी केज महावितरण कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला पञकार खतीब यांच्या कडून देण्यात आला आहे.