काळाची पावले कोणासाठीही थांबत नाहीत, पण त्या पावलांचा आवाज ऐकून समाज उभारणीचा दीप प्रज्वलित करणारे डॉ. देगलुरकर हे खरे समाजधुरंधर होते. तब्बल ३१ वर्षांपूर्वी वडार समाजाचे अभूतपूर्व ऐक्य उभे करून शासनाच्या दालनात इतिहास घडवणारा मेळावा त्यांनी घडवला.
सरकारी नोकरीच्या जोडीने समाजसेवेचा दीप प्रज्वलित करणे हा त्यांचा खरा वारसा आहे. नवी पिढीने त्यांचा हा आदर्श घ्यावा आणि समाज कार्याच्या मशालीला पुढे न्यायला हवे.
जयंती निमित्त त्यांना सर्वांच्या वतीने भावपूर्ण अभिवादन! 🙏

