पारोळा : श्रद्धा, संस्कार आणि भक्तिभावाचा सुगंध दरवळवणारी महालक्ष्मी पूजेची अखंड परंपरा यंदाही तेजोमय वातावरणात सुरू झाली आहे. तब्बल पाच पिढ्यांचा अखंड वारसा जपणारे बुंदेले कुटुंब देवीच्या कृपेवर श्रद्धेने नतमस्तक होत, ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५ दरम्यान हा मंगल सोहळा साजरा करत आहे.
ज्येष्ठ श्री गजानन गोविंद बुंदेले व सौ. सुभद्राबाई यांच्या हातून सुरू झालेली ही परंपरा आज त्यांच्या तृतीय चिरंजीव श्री रत्नाकर गजानन बुंदेले व सौ. उषा रत्नाकर बुंदेले, त्यानंतर श्री भास्कर रत्नाकर बुंदेले – सौ. वैशाली भास्कर बुंदेले, तसेच श्री शेखर रत्नाकर बुंदेले पणतवंडांच्या हाती पोहोचली आहे, हीच खरी भक्तीची साखळी व संस्कारांचा वारसा. देवीच्या कृपेमुळे संकटाच्या काळातही कुटुंब सुखरूप राहिले, अशी कृतज्ञ भावना बुंदेले कुटुंबीयांनी व्यक्त केली.
तीन दिवसांचा पूजनक्रम भक्तीमय असा –
🌸 ३१ ऑगस्ट : आवाहन व स्थापना
🌸 १ सप्टेंबर : महापूजन, महानैवेद्य, महाआरती व महाप्रसाद
🌸 २ सप्टेंबर : विसर्जन
“माऊलीचे आशीर्वाद आमच्यावर आणि सर्व समाजावर सदैव राहोत,” अशी प्रार्थना करून भाविकांना दर्शन, हळदीकुंकू आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, असे स्नेहपूर्ण आवाहन श्री भास्कर–वैशाली बुंदेले, श्री शेखर–रश्मी बुंदेले व श्री शुभम–अमृता बुंदेले यांनी केले आहे.
📍 स्थळ : हिंगलाज माता मंदिराजवळ, सुभाष रोड, भाटेवाडी, पारोळा




