shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कशिश निर्मित 'प्रलय' या मराठी चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर अनावरण सोहळा खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संपन्न: डेव्हिड लोखंडे

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

कोल्हापूर: राजश्री शाहू महाराजांच्या कलानगरीत सर्वसामान्यांच्या सामाजिक विषयावर आधारित 'प्रलय' सारखा मराठी चित्रपट सर्वसामान्यांच्या फार आवडेल,एखाद्या हिंदी सिनेमाला लाजवेल असे प्रमोशन 'प्रलय' चित्रपटाने केले आहे, केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात हा चित्रपट वेगळी उंची निर्माण करेल, महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांनी हा चित्रपट नक्की पहावा असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.

कशिश निर्मित ' प्रलय' चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलर अनावरण सोहळ्यात मार्केट यार्ड कोल्हापूर येथे ते बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर उपस्थित होते.

यावेळी खासदार धैर्यशील माने, निर्माता सरदार आवळे,ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर व मान्यवरांच्या हस्ते प्रलय या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला खासदार धैर्यशील माने व निर्माता सरदार आवळे यांच्या हस्ते चित्रपटातील मान्यवरांचा व प्रमुख कलाकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी जागतिक विश्वविक्रमवीर, गिर्यारोहक, कु.अन्वी चेतन घाटगे, आरोही संग्राम मोहिते, यांचा सत्कार करण्यात आला.

    या कार्यक्रमास निर्माता सरदार आवळे सहनिर्मात्या ज्योती आवळे, कार्यकारी दिग्दर्शक राहुल मोरे, दिग्दर्शक सचिन वारके, सहदिग्दर्शक शैलेश शिंदे,कथाकार हिरालाल कुरणे, कलाकार प्रतीक आवळे,अनुराधा धामणे,संजय मोहिते, बाळकृष्ण शिंदे, देवेंद्र चौगुले,उमेश बोळके, सुवर्णा काळे,आदित्य कुंभार,संतोष कसबे, आयूब इंगळीकर, आशुतोष निंबाळकर तुषार कुडाळकर, डेव्हिड लोखंडे, सतीश सर्वगोडे, निलेश सुतार,माजी सभापती राजेश पाटील, माले सरपंच राहुल कुंभार, हेर्ले पोलीस पाटील नयन पाटील,मुनीर जमादार, कपिल भोसले, सुरेश कदम, सुकुमार लोखंडे, विनायक पाटील,संजय हणमंत यांच्यासह कलाकार,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000
close