श्रीरामपूर प्रतिनिधी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,डॉ. खा .श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने व प्रदेश अध्यक्ष श्री बाळासाहेब किसवे सचिव राम रेपाळे साहेब ,सहसचिव एकनाथजी शेलार साहेब यांच्या हस्ते अहिल्यानगर मधील श्रीरामपूर व राहुरी च्या ओबीसी /व्हीजेएनटी च्या पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
मुंबई ,बाळासाहेब भवन येथे पार पडलेल्या बैठकी मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या .या प्रसंगी श्रीरामपूर शहर प्रमुख विठ्ठल गोराणे, उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे श्रीरामपूर, विजय थोरात उपजिल्हाप्रमुख राहुरी, प्रशांत खळेकर राहुरी तालुकाप्रमुख, अमोल शिंदे राहुरी शहर प्रमुख ,गिरीश वाडेकर श्रीरामपूर उप शहर प्रमुख यांना निवडीचे पत्र देण्यात आले.या वेळी प्रदेशाध्यक्ष किसवे साहेबांनी मोलाचे मार्गदर्शन करून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगितले की तुम्ही एकनिष्ठ प्रामाणिकपणे पक्षासाठी,पक्षवाढी साठी काम करा पक्ष तुम्हाला भर-भरून देईल. तुमचे सर्व कामे, समस्या नक्कीच मार्गी लावल्या जातील असे आश्वासन दिले.
या झालेल्या निवडीचे शिवसेना नेते माजी आमदार भाऊसाहेब कांबळे , एडवोकेट मा.नगरसेवक संतोषजी कांबळे यांनी सर्व पदाधिकारी यांचे श्रीरामपूर येथील शिवसेना संपर्क कार्यालय येथे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व यावेळी ते त्यांच्या भाषणात म्हणाले की मी सुद्धा असेच छोट्या-मोठ्या पदापासून पुढे गेलो कोणताही पद छोटे आणि मोठे नसतं मी संत रोहिदास सोसायटीच्या चेअरमन पासून सुरवा केली प्रमाणिक काम व सततच्या जनतेची सेवा केल्याने मी नगरसेवक झालो व प्रामाणिक काम केल्यामुळे मला संधी मिळत गेली व जनसंपर्क वाढला व नगरसेवक ते आमदार हा असा प्रवास पुढे घडत गेला असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली पक्षासाठी प्रामाणिक काम करण्या साठी व पक्ष वाढीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी माजी आमदार ज्येष्ठ नेते मा .आमदार भानुदास मुरकुटे ,श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भैया बेग मा.नगरसेवक संतोष जी कांबळे, जिल्हाध्यक्ष नितीन औताडे, संजय निराधार चे शासकीय सदस्य उपजिल्हाप्रमुख संजय बाहुले, मा. उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, युवा नेते नीरज मुरकुटे, तालुका प्रमुख संतोष डहाळे, सागर कुदळे, संभाजी देवकर, विशाल दुर्गे, शुभम ताके,राजेश वाव्हळ,संजय फरगडे, शिवनाथ फोपसे, बाबासाहेब राऊत, बाबासाहेब कांबळे, प्रशांत कांबळे, शिवाजी सिनारे, सागर भांड ,भाऊसाहेब जाधव, बाबासाहेब शेंडे ,आप्पासाहेब माकोणे ,संस्कार जाधव, वसंत कदम, प्रज्वल पवार ,किशोर फाजगे आदीनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.