shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न..



 प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी*:-
 __________________
 केज येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन  शाळेचे  सचिव श्री. गदळे सर यांच्या हस्ते संपन्न झाले . या कार्यक्रमाला अध्यक्षा श्रीमती शैलजा इंगळे मॅडम  व प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती रेखा यादव मॅडम तालुका क्रीडा अधिकारीउपस्थित होत्या.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विनोद गुंड  सर यांनी केले. या   कार्यकामाचे प्रमुख अतिथी यांचे स्वागत श्री. विनोद गुंड सर,तांदळे सर,व स्वंराजली मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला  मार्गदर्शन श्री. गदळे  सर यांनी केले .
या वेळी क्रीडाश्रेत्राविषयी  व बुद्धिबळ खेळाविषयी खेळाडूंना माहिती दिली. या स्पर्धाला प्रमुख  क्रीडा शिक्षक वर्षा मॅडम , गिरी सर, श्री.   साजेद पठाण सर ,श्री  बोबडे सर श्री  राऊत सर श्री. राऊत सर कांदे मॅडम गोसावी सर  नेहरकर सर, पोटभरे सर उपस्थित होते. त्यांचा सत्कार श्री विनोद गुंड सर  यांनी केला. या स्पर्धेला केज तालुक्यातील अनेक शाळेतील खेळाडूंनी सहभाग  नोंदवला.  या कार्यक्रमाला शाळाचे शिक्षक, शिक्षका, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
close