प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
शिक्षक कॉलनी भागातील डि.पी.वरील सतत फ्युज जात असल्याने व डि. पी. ओव्हरलोड होत असल्यामुळे शिक्षक कॉलनीतील विद्युत ग्राहकांची हेळसांड होत होती. सर्व शिक्षक कॉलनी कर या सततच्या विद्युत पुरवठा न झाल्यामुळे व फ्युज उडल्यामुळे वैतागून गेले होते.
या आधी या डीपी वरती फक्त दोन सर्किट होते त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा होत नव्हता. वारंवार होणाऱ्या या त्रासापासून मार्ग काढण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा काकाजी , गटनेते हरून भाई इनामदार, डॉ. वासुदेव नेहरकर, दत्ता धस पंत, पिटू भैय्या तांदळे तसेच पत्रकार प्रकाश मुंडे यांनी पुढाकार घेऊन सदरील डीपीवरील दोन सर्किटचे चार सर्किट केल्यामुळे डीपीवरील ताण कमी होऊन शिक्षक कॉलनी भागातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे. सदरील डीपीवरील दोन सर्किटवर प्रशांत बार च्या खालील तीन गल्ल्या व राहिलेल्या दोन सर्किटवर प्रशांत बारच्या वरच्या बाजूच्या तीन गल्ल्या यांना विद्युत जोडणी केल्यामुळे ग्राहकांना या नाहक त्रासातून यापुढे मुक्ती भेटणार आहे.
या कामासाठी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ लांबतुरे रेवनसिद्ध महालिंग ,उपकार्यकारी अभियंता सय्यद साहेब, सहाय्यक अभियंता सय्यद मॅडम यांनी आज डी.पी. चे चार सर्किट सुरळीत चालू करून दिले आहेत .त्यामुळे शिक्षक कॉलनी आणि या भागातील विद्युत ग्राहकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

