shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"प्रवक्ता अकॅडमीच्या स्पर्धेत गुणवत्तेचा सन्मान; विजेत्यांना सायकल आणि स्मृतिचिन्हांची पारितोषिके"

"प्रवक्ता अकॅडमीच्या स्पर्धेत गुणवत्तेचा सन्मान; विजेत्यांना सायकल आणि स्मृतिचिन्हांची पारितोषिके"

पारोळा प्रतिनिधी
:--पारोळा येथील टायगर इंटरनॅशनल स्कूल मध्ये"प्रवक्ता अकॅडमी"तर्फे आयोजित बेसिक नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन 2025मोठ्या उत्साहात पार पडली. ही स्पर्धा A गट,पहिली ते चौथी,B गट,पाचवी ते सातवी आणि C गट आठवी ते 10 वी अशा तीन गटांत विभागण्यात आली होती. प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांची 10 मिनिटांची बेसिक लेव्हल टेस्ट पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली.

स्पर्धेमध्ये 3 प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल,3 द्वितीय व 3 तृतीय क्रमांकासाठी स्मृती करंडक व सन्मान चिन्हे देण्यात आली. यासोबतच प्रत्येक शाखेतील एका विद्यार्थ्याला"बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड"देण्यात आला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मेडल्स आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा भैरवी वाघ - पलांडे,टायगर इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष रविंद्र पाटील, सचिव रुपाली पाटील,प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील,आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील,सर्व प्रवक्ताअकॅडमी शाखांचे संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.

भैरवी वाघ यांनी विद्यार्थ्यांना दररोज वाचन करण्याचा,पाया मजबूत करण्याचा आणि यशाकडे वाटचाल करण्याचा सल्ला दिला.तर लक्ष्मणराव पाटील यांनी स्पर्धेत सहभागाचं महत्त्व अधोरेखित केलं आणि सर्व आयोजकांचे अभिनंदन केले.

रविंद्र पाटील यांनी सांगितले की, इंग्रजी ही भाषा विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर जोडते,आणि प्रवक्ता अकॅडमी AI तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगत अध्यापन करत आहे.

या स्पर्धेमध्ये600 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.काही विद्यार्थ्यांनी नृत्य, गायनासारख्या कलागुणांचं सादरीकरण करत उपस्थितांचं मन जिंकलं.

स्पर्धेत सहभागी झालेल्या शाखा:पारोळा, धरणगाव, एरंडोल, शहादा, शेंदुर्णी, रावेर, बोराडी, कासोदा, धुळे, चाळीसगाव, मालेगाव, कजगाव. सोनगीर यातील सर्व ब्रांच हेड्सनाही "बेस्ट परफॉर्मर" आणि "बेस्ट पार्टिसिपंट" पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.

कार्यक्रमाचं संचालन तेजश्री विसपुते यांनी तर आभार प्रदर्शन मंगेश पवार यांनी केलं. यशस्वी आयोजनासाठी टायगर इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रवक्ता अकॅडमीच्या सर्व शाखांतील शिक्षकांनी मोलाचा सहभाग दिला.

close