एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल येथील संत गजानन महाराज मंदिर प्रांगणात दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी संत निरंकारी फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.संत निरंकारी फाऊंडेशनतर्फे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात येणाऱ्या या रक्तदान शिबीरात मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांचा सहभाग अपेक्षित आहे.
रक्तदान करण्यासाठी समस्त निरंकारी मंडळ आणि संत निरंकारी फाऊंडेशनतर्फे सर्व शहर वासीयांना आवाहन करण्यात आले आहे.या उपक्रमाचे उद्घाटन माजी आमदार हिरालाल पाटील यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महेश वाघ भूषविणार आहेत. तसेच प्रांता धिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार प्रविण भिरुड, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गावाला व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रक्तदान शिबीराच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे हा यामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.