shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ.नमिता मुंदडा यांच्या उपस्थितीत केज तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन बैठक संपन्न..

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
​केज तहसील कार्यालयात सोमवार, 29 सप्टेंबर रोजी  नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार नमिता मुंदडा , जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा काकाजी, उपजिल्हाधिकारी श्री दिपक वांजळे,यांच्यासह तहसीलदार राकेश गिड्डे , गटविकास अधिकारी नागरगोजे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर, तालुका अध्यक्ष भगवान केदार, संदीप पाटील, नेताजी शिंदे, वसंत केदार, सुनील आबा गलांडे, महादेव अण्णा सुर्यवंशी, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव आणि तालुका कृषी अधिकारी पठाडे साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.
​या बैठकीत सध्याच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टी,  पूर, सोयाबीन व इतर पिकांचे केज तालुक्यात झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषत: शेती पिकांचे झालेले मोठे नुकसान आणि त्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांवर विस्तृत चर्चा झाली.
​आमदार नमिता मुंदडा यांनी यावेळी बोलताना, नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी कृषी विभाग आणि महसूल विभागाला तातडीने पंचनामे पूर्ण करून, नुकसानीचे अचूक अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.
​तहसीलदार राकेश गिड्डे  यांनी तालुक्यात आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर केला. तसेच, नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
​तालुका कृषी अधिकारी यांनी पिकांच्या नुकसानीची माहिती दिली आणि पंचनाम्याच्या प्रक्रियेत कृषी विभागाचे कर्मचारी सक्रिय असल्याचे स्पष्ट केले.
​या बैठकीत शासकीय मदत लवकर मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यावर भर देण्यात आला. तसेच, भविष्यात नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या पूर्व तयारीच्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला.
​या बैठकीमुळे आपत्तीग्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार  असून, पंचनामा प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन त्यांना आर्थिक मदत मिळेल अशी माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली आहे.
close