shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोठला परिसरात तणावपूर्ण शांतता; पोलिसांचा कडक बंदोबस्त

शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा | अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील बारातोटी कारंजा परिसरात एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत कोठला परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली तसेच दगडफेकही केली.

परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगवला. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ३० ते ३५ जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.


 पोलिसांवरही दगडफेक

या आंदोलनामुळे पुणे–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना वारंवार विनंती केली. मात्र, आंदोलक आक्रमक झाले आणि पोलिसांवरही दगडफेक केली. त्यामुळे काही वेळ गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.

 पोलिसांचा कडक बंदोबस्त

गोंधळानंतर आता कोठला परिसरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्त्यांवर गस्ती वाढवण्यात आली असून नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी वातावरणात तणावपूर्ण शांतता आहे.

००००

close