shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री महादेव मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी दिलीप लबडे यांची एकमताने निवड

श्रीरामपूर / प्रतिनिधी: 
श्रीरामपूर शहरालगत असलेल्या गोंधवणी - भैरवनाथनगर  येथील पुरातन महादेव मंदिर सर्वत्र प्रसिद्ध आहे.या ठिकाणी उत्तराभिमुख श्री काशी विश्वेश्वराचे व पूर्वाभिमुख श्री रामेश्वर अशी दोन अति प्राचीन शिवलिंगे आहेत.  

श्री क्षेत्र काशी नंतर अशा प्रकारचे शिवलिंग याच ठिकाणी आहेत .श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठ्या - मोठ्या रांगा लागून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. देवस्थानचा जिर्णोध्दार करणेस्तव या ठिकाणी श्री महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली असून पदाधिकाऱ्यांचे निवडीसाठी या ट्रस्टच्या विश्वस्त मंडळा चे माजी अध्यक्ष श्री बाळासाहेब सुखदेव लबडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली, या सभेत ट्रस्ट च्या अध्यक्षपदी सर्वश्री दिलीप नारायण लबडे, मानद सचिवपदी सुनील विजयराव सुतावणे,खजिनदार म्हणून बबनराव रामभाऊ लबडे यांची फेर निवड करण्यात आली .
     याप्रसंगी माजी आ. भाऊसाहेब कांबळे, राजेंद्र जनार्दन लबडे , योगेश हरिभाऊ फरगडे, शंकराव चव्हाण आदि विश्वस्त, नागरीक उपस्थित होते.
निवडीनंतर श्री भैरवनाथ प्रतिष्ठान गोंधवणी, महादेव मंदिर भजनी मंडळ, दत्त सेवा प्रतिष्ठान यांनी  नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार विठ्ठल गोराणे - गोंधवणी 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर 9561174111
close