shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कुळे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अनिता मालपूटे बिनविरोध

मुळशी -कुळे (ता. मुळशी ) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अनिता श्रीकांत मालपूटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच आकाश साठे यांच्या अध्यक्षते खाली निवड करण्यात आली. निवडीनंतर सर्वांनी भंडाऱ्यांची उधळण करत आनंद साजरा केला. 

या वेळी ग्रामविकास अधिकारी मोहन डोणगावे यांनी निवडणुकीचे कामकाज पहिले. निवडीनंतर माजी सभापती बाबा कंधारे, राष्ट्रवादी मुळशी युवक अध्यक्ष सुखदेव मांडेकर, शिवसेनेचे नेते (उबाटा )अविनाश बलकवडे, मुळशी शिवसेना (उबाटा )तालुका प्रमुख सचिन खैरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गायकवाड, नियोजन सदस्य अमित कंधारे, माजी सरपंच भाऊ हुलावळे, चेतन फाले, माऊली डफळ यांनी उपसरपंच अनिता मालपूटे यांचा सत्कार केला. यावेळी माजी सरपंच मंदा मराठे, उपसरपंच दिपाली साठे, माजी उपसरपंच सुजाता पाटणकर, सदस्य मंगल साठे, पोलीस पाटील हेमलता मानकर उपस्थित होते.

सामाजिक कार्यकते मारुती साठे उदयोजक शशिकांत साठे, नथू मालपूटे ,गणेश यादव, नंदू जगम, दीपक दगडे, श्रीकांत मराठे, दगडू वारंगे, दीपक यादव, अण्णा यादव, सुनील तोंडे, देविदास तोंडे, शंकर यादव, उमेश साठे, राजेंद्र यादव, चंद्रकांत मालपूटे, संतोष कंधारे, सुरेश कंधारे, संतोष ढोरे, नवनाथ चरवड, नाना साठे, धनंजय साळुंखे, कुडलिक हुलावळे, अक्षय साठे, दीपक साठे आदी उपस्थित होते.
close