shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वास्थ नारी सशक्त परिवार अभियान सोमैया हायस्कूल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न.

हिंद सेवा मंडळाच्या क.जे.सोमैया हायस्कूल मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जन जागृती अभियान घेण्यात आले. या कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालय, श्रीरामपूर जनसंपर्क अधिकारी तथा समुपदेशक प्रसन्ना धुमाळ, बाबासाहेब जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक भूषण गोपाळे, पर्यवेक्षक कल्याण लकडे उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत इंटेन्सिफाईड अभियान, त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी याच्या जन्म दिवसा निमित आयोजित सेवा पंधरवाडा अभियान अंतर्गत स्वास्थ नारी सशक्त परिवार हा प्रकल्प राबविला जात आहे.


या कार्यक्रमात विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच सध्या पावसाळा सुरू आहे या ऋतूमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
close