shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे तातडीने मार्गी लावा - आमदार मा.अमोल पाटील.

पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे तातडीने मार्गी लावा - आमदार मा.अमोल पाटील.

एरंडोल
- तालुक्यातील सरपंंच व ग्रामपंचायत अधिकारी यांची आढावा बैठक आमदार मा.अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात पार पडली. 

याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोजभाऊ पाटील, प्रकल्प संचालक राजु लोखंडे, पारोळा भुषण साप्ताहिकाचे संपादक भिकाभाऊ चौधरी, तहसिलदार प्रदीप पाटील, गटविकासअधिकारी दादाजी जाधव, तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, मा.तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, अंतुर्ली सरपंच गौरव पाटील, शहरप्रमुख अतुल मराठे, टोळी मा.सरपंच बाळासाहेब पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध गावांतील ग्रामपंचायतीचे सरपंंच, कर्मचारी उपस्थित होते.

पंचायत समिती, तहसिल कार्यालय व इतर स्थानिक विभागांमध्ये लहान-मोठ्या कामांसाठी मोठी भटकंती होत असते. अनेक महिने, वर्षांपासुन प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणे व लहान कामांसाठी होत असलेली भटकंती थांबावी या उद्देशाने आज ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. याठिकाणी आलेल्या तक्रारी या त्वरीत सोडवा व पात्र लाभार्थ्यांना तातडीने लाभ मिळवुन देण्याचा सुचना आमदार मा.अमोल पाटील यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

close