पुणे, शनिवार दि. ११ ऑक्टोबर २०२५ (सायंकाळी ६ वा.) — मयूर कॉलनी, कोथरूड येथील "फॅन्ड्री" पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांशी रंगलेली एक अर्थपूर्ण भेट आणि संवाद पाहुन वडार समाजाच्या साहित्यिक चळवळीला नवी ऊर्जा मिळाली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पुणे येथे पार पडणार्या तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन — २०२५ यांच्या संयोजन समितीने मराठी चित्रपटातील लोकप्रिय दिग्दर्शक मा. श्री. नागराज अण्णा मंजुळे यांची आदराने भेट घेऊन त्यांना पुढील संमेलनात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले
दिग्दर्शक मा. नागराज अण्णा मंजुळे यांनी उपस्थितांशी आपुलकीने मनोगत व्यक्त केले व संमेलनाच्या हेतूविषयी उत्सुकता दाखवली. त्यांनी कार्यक्रमाचा वेळापत्रक पाहून “दोन दिवसांत नक्की कळवेन” असे सकारात्मक आश्वासन दिले, ज्यावर संयोजन समितीचे मतप्रकाश उत्साहात उभे राहिले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक टी. एस. चव्हाण यांनी आपल्या काही मौल्यवान पुस्तकांची प्रती आणि मागील साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका मा. मंजुळे यांना सन्मानी भेट म्हणून प्रदान केली, ज्यामुळे या भेटीचे साहित्यिक गांभीर्य अधोरेखित झाले.
आयोजक व उपस्थित मान्यवरांमध्ये सोलापूर चे उद्योजक मा. मनोहर मुधोळकर, उद्योजक मा. रमेश अण्णा शिंदे, पुणे, पत्रकार मा. रमेश जेठे (अहिल्यानगर), मा.डाॅ.अशोक बंडगर सर, संभाजीनगर,मा.अर्चनाताई लष्कर (मुंबई), मा. बालाजी शिंदे, क्राईम पत्रकार मा. शामराव विटकर, संस्थापक अध्यक्ष — वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान, पुणे, तसेच मा. हरिष बंडीवडार, मा. शंकर विटकर, मा. लक्ष्मण चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
या भेटीमुळे वडार समाजाच्या बोली-वार्तांकन, सामाजिक समस्यांसाठी साहित्याच्या माध्यमातून केलेल्या आव्हानांना व्यासपीठ मिळेल असा सर्वांचा एकमत दर्शविण्यात आला. पुढील संमेलनात मा. नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीची खात्री मिळाली तर कार्यक्रमाला व्यासपीठावर एक नवीन कलात्मक व सामाजिक गती प्राप्त होईल, असा विश्वास संयोजन समितींनी व्यक्त केला.
०००