shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शास्त्री फार्मसी महाविद्यालयात राज्यस्तरीय शिक्षक कार्यशाळा.

शास्त्री फार्मसी महाविद्यालयात राज्यस्तरीय शिक्षक कार्यशाळा.

एरंडोल (प्रतिनिधी) : शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मसी दिन व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांच्या वाढदिवसा निमित्त शिक्षकांसाठी राज्यस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयो जन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सह आयोजन असोसिएशन ऑफ फार्मासुटीकल टीचर ऑफ इंडिया (APTI) च्या सहकार्याने करण्यात आले होते.

कार्यशाळेचे उद्घाटन सरस्वती व धन्वंतरी पूजन तसेच दीपप्रज्वलनाने झाले. प्रास्ताविकात डॉ. पराग कुलकर्णी यांनी कार्यशाळेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. सकाळच्या सत्रात डॉ. कुलदीप बनसोड यांनी आधुनिक फार्मसी शिक्षणातील नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती व संशोधनातील संधी यावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात डॉ. प्रबोध सपकाळे यांनी ताणतणाव व्यवस्थापन, तर डॉ. चैताली पवार यांनी द पावर ऑफ इनरमाइंड या विषयावर व्याख्यान दिले.

या कार्यशाळेला राज्यातील विविध महाविद्या लयांतील सुमारे ५५ शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.अनुप कुलकर्णी व प्रा. योगेश्वरी लोहार यांनी केले, तर आभार प्रा. जावेद शेख यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. राहुल बोरसेसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

close