shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

य शाळेतील विद्यार्थिनींची गगनभरारी... इस्रो सहलीकरिता झाली निवड..!!

शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,

दिपक हरिश्चंद्रे.

गुरूवार  ता. ०२/१०/२०२५.

इस्रो सहलीसाठी कुरणवाडी शाळेची वैष्णवी खिलारी हिची निवड...


राहुरी : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा असलेला दूरदर्शी उपक्रम म्हणजे इस्रो सहल, केरळ मधील थुंबा या ठिकाणी असलेल्या संशोधन केंद्रास भेट देण्यासाठी कुरणवाडी शाळेची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी धोंडीराम खिलारी हिची निवड झालेली असून सबंध तालुक्यातून इयत्ता सातवी व आठवीच्या गटात चांगले गुण प्राप्त करून तिने हे यश प्राप्त केलेले आहे.

    


        याप्रसंगी तिचे सर्वत्र कौतुक होत असून कुरणवाडी सारख्या दुर्गम भागात असलेली शाळा व त्या ठिकाणी असलेले गुणवत्ता याद्वारे वैष्णवी ने हे निर्भेळ यश संपादन केलेले असून तिला या माध्यमातून विमान प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे.

               यासाठी तिला मुख्याध्यापक विजय कदम वर्गशिक्षक राजेंद्र  मरभळ गणित शिक्षक बाबासाहेब चव्हाण, बाळासाहेब जाधव सर, जगताप सर, पवार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच प्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य व कुरणवाडी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन या सर्वांनी तिचे मनस्वी अभिनंदन केले.

         तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री मोहिनीराज तुंबारे साहेब, विस्तार अधिकारी इंदुमती देवरे मॅडम व केंद्रप्रमुख भागवत मॅडम यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close