shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत शिरूरघाटच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी 


केज तालुक्यातील शिरूरघाट (ता.केज) येथील माजी सरपंच सुंदर हजारे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे ध्येयधोरण आणि विकासकामांवर विश्वास ठेवून, पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पक्षात प्रवेश केला.

​ 



आज, बीड येथे झालेल्या एका महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळ्यात केज तालुक्यातील शिरूरघाट येथील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करताना मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आणि आगामी काळात पक्षाचे ध्येयधोरण व विकासकामे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रिय राहून पक्षकार्य करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्वांनी व्यक्त केला.

​प्रमुख नेत्यांचा पक्षप्रवेश

​यावेळी शिरूरघाट, ता. केज येथील माजी सरपंच सुंदर हजारे, पांडुरंग चांगण,अशोक गायकवाड, नवनाथ धेंडूळे, रवींद्र विडेकर, आश्रुबा घोडके, मारुती लोंढे, दिनकर केकाण, विकास भवलकर, रामेश्वर हजारे , इंद्र मोहन गदळे, हरिदास तांबडे, पप्पू गदळे ,महादेव तांबडे, मच्छिंद्र सांगळे ,इसरण सांगळे ,विजय सांगळे ,सुग्रीव सांगळे ,दिनकर केकान, उत्तरेश्वर सांगळे, नितीन डोईफोडे ,अक्षय गीते, बळीराम डोईफोडे ,शिवाजी सांबरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

​आज संपन्न झालेल्या या पक्षप्रवेशामुळे येणाऱ्या काळात पक्षाला निश्चितच संघटनात्मक बळकटी मिळेल आणि बीड जिल्ह्यात भाजपचे कार्य अधिक जोर धरेल.

​उपस्थित मान्यवर

​यावेळी मा .जि.प. सदस्य संतोष हांगे, ता.अध्यक्ष भगवान केदार,मा . सभापती विष्णू घुले, वैद्यकीय आघाडी बीड जिल्हा अध्यक्ष डॉ. वासुदेव नेहरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close