shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काळेवाडी नं. १ जि प शाळेत लोकसहभागातुन साऊड सिस्टीम भेट

काळेवाडी नं. १ जि प शाळेत लोकसहभागातुन साऊड सिस्टीम भेट
इंदापूर:  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळेवाडी नंबर १ या ठिकाणी नोव्हेंबर, २०२५ ची शाळा व्यवस्थापन समितीची मासिक सभा संपन्न झाली . यामध्ये मुलांच्या शालेय परिपाठासाठी व विविध प्रकारच्या सांस्कृतीक कार्यकमासाठी लागणाऱ्या  सिस्टीम बाबतीत चर्चा करुन लगेच निर्णय घेण्यात आला . त्यासाठी  पालकांनी खालील प्रमाणे लोकवर्गणी जमा केली. प्रताप शिरसट सर ५०० रुपये ,वनराज पोटे ५००रुपये ,गणेश काळे ५००रुपये ,धनाजी चव्हाण  ५००रुपये ,अतुल काळे ५००रुपये,
शरद तावरे ५००रुपये, सागर चव्हाण ५००रुपये,सोमनाथ काळे १०००रुपये व 
संतोष गायकवाड ५००रुपये या लोकसहभागातुन पैसे जमा करुन साऊंड सिस्टिम घेण्यात आली . त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक उपक्रमाबरोबरच शालेय पाठ्यक्रमातही याचा वापर होऊन मुलांची  प्रगती होण्यास मदत होईल . या वेळी वर्गणी जमा केलेल्या सदस्यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक प्रताप शिरसट यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले.
close