shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेचे निवेदनाला मोठे यश ; चांदणी चौकाचे नाव होणार रामायण रचियता " महर्षी वाल्मिकी चौक "

प्रतिनिधी :  संजय वायकर

अहिल्यानगर :  चांदनी चौकाचे नामांतर करून महर्षी वाल्मिक चौक नामकरण करण्यात यावे असे निवेदन अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटना व समस्त वाल्मिकी समाज्याच्या वतीने अहिल्यानगर शहरातील माननीय आमदार श्री. संग्राम भैय्या जगताप व तसेच महानगर पालिकाचे आयुक्त श्री. डांगे साहेब यांना निवेदन देण्यात आले होते.हिंदू धर्म रक्षक आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या पुढाकाराने चांदणी चौक या नावाला मंजूरी मिळाली तरी या बाबत आज महानगर पालिका तर्फे अधिकृत मंजूरी देण्यात आली व आज अहिल्या नगर शहरातील माननीय आमदार श्री.संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते संघटचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे यांना मंजूरी पत्र देण्यात आले. या निमित्त आमदार संग्राम भैय्या जगताप यांचे संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले व संग्राम भैय्या यांचे वाल्मिकी समाज्याच्या वतीने मनापासून आभार व धन्यवाद व्यक्त करण्यातआले या प्रसंगी अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, जिल्हा सचिव अर्जुन जी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते राजू चव्हाण, विक्की करोलिया, राहुल गोहेर, राकेश नरवाडे, जय चव्हाण गोविंद घोड़के आदि समाज बाधव मोट्या सखये उपस्थित होते .
close