shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोपी गोल्ड शाळेच्या ३३ विद्यार्थ्याची रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड.

गोपी गोल्ड शाळेच्या ३३ विद्यार्थ्याची रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड.

 प्रतिनिधी - एरंडोल येथील गोपीगोल्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ३३ विद्यार्थ्यांची रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात आली.

रंगोत्सव सेलिब्रेशन ऑर्गनायझेशन यांच्या मार्फत राष्ट्रीय पातळीच्या रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.ज्यात गोपी गोल्ड शाळेतील ज्युनियर के.जी.ते १० वी तील एकूण १४४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून ३३ विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात आली आहे तसेच निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना गोल्ड, सिल्वर तसेच ब्राँझ मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.तसेच बाकी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. किंजल अमोल भोई सिनियर केजी , श्रुति राजेंद्र कटारी इयत्ता ४:थी,जानवी सोमनाथ माने इयत्ता १० वी या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सहभागाबद्दल सरप्राइज गिफ्ट मिळाले. सदर स्पर्धेचे नियोजन गौरी सोनार मॅडम यांनी केले. त्यांना देखील रंगोत्स्व ऑर्गनायझेशन यांच्या तर्फे ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले . शाळेचे प्राचार्य सुनील ठाकरे व उपप्राचार्या ज्योती वडगावकर यांनी या स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष सचिन विसपुते तसेच माध्यमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका अंजुषा विसपुते यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

close