*एल.जी. बनसुडे विद्यालयात बालदिन* *उत्साहाच्या वातावरणात साजरा* : *अबॅकस मधील* *बालचमुंचा विशेष गौरव*
इंदापूर : पळसदेव (ता. इंदापूर)-१४ नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून एल. जी. बनसुडे विद्यालयात बालदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. प्री-प्रायमरी विभागातील लहान बालचमूसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. तर इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाषणे, नाटिका यांद्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवनचरित्र, कथा, गोष्टी तसेच बालमनांची स्वप्ने प्रभावीपणे सादर केली.
बालदिनानिमित्त अबॅकसच्या लेवल वन व लेवल टू मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. लेवल वनमध्ये शिवराज जगताप, साक्षी काळे, ऋषिकेश दरदरे, गणेश थोरात, यश पानसरे यांना 90 पेक्षा अधिक गुण मिळाले. तर लेवल टू मध्ये आदेश कनेरकर, हर्षदा कोळेकर, स्वरा नगरे, राज बनसुडे, सौरभ तेरवे या विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तुंग यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. आजच्या
कार्यक्रमास संस्थेच्या कार्याध्यक्षा आदरणीय नंदा बनसुडे, सचिव नितीन बनसुडे,प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, उपमुख्याध्यापिका सुवर्णा वाघमोडे, विभाग प्रमुख तनुजा फुगे, सीमा बाराते, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विभागप्रमुख ज्योती मारकड यांनी केले.

