shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५: रणधुमाळी शिगेला!


नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवार, नगरसेवक पदासाठी १३२ जण रिंगणात

नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत महिलांचे वर्चस्व; ११ प्रभागांमध्ये पारंपरिक घराण्यांसह नवे चेहरेही मैदानात

शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )

साईनगरी शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, अंतिम उमेदवार यादी जाहीर झाली आहे. यादी जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून, गल्लीपासून सोशल मीडियापर्यंत निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे.
यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक होत असून, नगराध्यक्षपदासाठी एकूण ११ उमेदवार तर नगरसेवकपदासाठी ११ प्रभागांमधून १३२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे शिर्डीची २०२५ ची ही निवडणूक बहुरंगी, चुरशीची आणि ऐतिहासिक ठरणार आहे.

भाजप, काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा गट), राष्ट्रवादी (अजितदादा गट), लोकक्रांती सेना पक्ष, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष उमेदवार अशा सर्वच पातळ्यांवरून जोरदार उमेदवारी दाखल झाल्याने प्रत्येक प्रभागात ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे.

नगराध्यक्ष पदासाठी चुरशीची लढत – महिलांचे जबरदस्त वर्चस्व

नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीत यंदा महिलांचे प्रचंड वर्चस्व दिसत आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना (उबाठा), लोकक्रांती सेना पक्ष, अपक्ष अशा विविध पातळ्यांवरून उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे –

1. सौ. जयश्री विष्णुपंत थोरात (भाजप)

2. सौ. भाग्यश्री सुयोग सावकारे (शिवसेना उबाठा) (२)

3. सौ. माधुरी अविनाश शेजवळ (काँग्रेस)

4. सौ. अनिता सुरेश आरणे (अपक्ष)

5. सौ. कल्याणी विठ्ठल आरणे (लोकक्रांती सेना पक्ष)

6. सौ. सुनीता भाऊसाहेब झरेकर

7. सौ. मनिषा नितीन झरेकर

8. सौ. सायली दिगंबर मोरे

9. सौ. मेघना ज्ञानेश्वर खंडीझोड

10. सौ. संजीवनी कृष्णकांत बांगर

या सर्व उमेदवारांमध्ये शहरातील विविध गट-तट, सामाजिक, राजकीय समीकरणे, महिला नेतृत्व आणि नव्या पिढीचा विचार यांचे प्रतिबिंब दिसत असल्याने अंतिम लढत अधिकच रोचक होणार आहे.

---

नगरसेवक पदासाठी १३२ उमेदवार – ११ प्रभागांत बहुरंगी स्पर्धा

नगरसेवक पदांसाठी सर्व ११ प्रभागांमध्ये उमेदवारांचा तुफान ओघ पाहायला मिळाला. भाजप, काँग्रेस, शिवसेना (शिंदे/उबाठा), राष्ट्रवादी (अजितदादा गट), लोकक्रांती सेना पक्ष, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्षांच्या माध्यमातून १३२ जणांनी आपले अर्ज भरले आहेत.

महिला उमेदवारांचा सर्वच प्रभागांतील लक्षणीय आणि भक्कम सहभाग हे यंदाच्या निवडणुकीचे विशेष वैशिष्ट्य ठरत आहे. अनेक प्रभागांत पुरुषांइतक्याच ताकदीने महिला उमेदवार रिंगणात उतरल्या असून, शिर्डीच्या नगरकारभारात महिलांचा प्रभावी हस्तक्षेप वाढणार असल्याचे चित्र यातून दिसत आहे.

---

प्रभागनिहाय संपूर्ण उमेदवार यादी

प्रभाग क्रमांक १

निलेश मुकुंदराव कोते (अजित दादा गट)

प्रतीक राजेंद्र शेळके (४)

गणेश सिद्धेश्वर वाकचौरे (लोकक्रांती सेना पक्ष)

उत्तम एकनाथ त्रिभुवन

सौ. अनिता सुरेश आरणे

सौ. सुनीता मंगेश त्रिभुवन (भाजप)

---

प्रभाग क्रमांक २

सुजित ज्ञानदेव गोंदकर (भाजप)

सतिश गोविंदराव गोंदकर (२)

तुषार विलास गोंदकर

अमृत भाऊसाहेब गायके (२) (काँग्रेस)

सचिन सोपान गोंदकर

गणेश यमाजी मिसाळ

सौ. सुनीता वसंत गोंदकर (शिवसेना शिंदे गट)

सौ. शारदा महेंद्र गोंदकर

सौ. शुभांगी चेतन कोते (लोकक्रांती सेना पक्ष)

सौ. उषा सोपान गोंदकर

सौ. सोनाली अनिल मलदोडे

---

प्रभाग क्रमांक ३

बापू ठाकरे (शिवसेना शिंदे गट)

सुयोग युवराज सावकारे (शिवसेना उबाठा)

सुरेश काळू आरणे

विश्वजित संतोष वाघ

अजिंक्या संतोष वाघ

कैलास हिरामण आरणे

संदीप विलास शेजवळ (काँग्रेस)

दीपक भानुदास भांड (लोकक्रांती सेना पक्ष)

सोन्याबापू शंकर शेलार

सौ. आशाबाई कमलाकर कोते (शिवसेना शिंदे गट)

कोमल संग्राम बनसोडे (शिवसेना उबाठा)

सौ. शीतल गणेश गोंदकर

---

प्रभाग क्रमांक ४

नितीन उत्तमराव कोते (भाजप)

अमित कैलासराव शेळके

सोमनाथ विष्णू कोते

संपत भाऊसाहेब जाधव

विनोद बाळासाहेब गोंदकर

सचिन उत्तमराव काटकर

संपत कारभारी काटकर

सौ. गायत्री राजेंद्र बर्डे (भाजप)

सौ. सुनीता राजू बर्डे (काँग्रेस)

सौ. वैशाली मोहन निकम

---

प्रभाग क्रमांक ५

अभय दत्तात्रय शेळके (भाजप)

संदीप गणेश तारडे (काँग्रेस)

घनश्याम प्रेम सोनेजी

महेश कृष्णा साना

विद्या श्याम जाधव (भाजप)

सौ. मनिषा संदीप भडांगे (काँग्रेस)

सौ. शीतल रवींद्र त्रिभुवन (शिवसेना उबाठा) (२)

मीरा कृष्णा साना (लोकक्रांती सेना पक्ष)

सौ. सोनाली बाबासाहेब दिवे

---

प्रभाग क्रमांक ६

सचिन सीताराम गायकवाड (भाजप)

सूरज बाळासाहेब गायकवाड (काँग्रेस)

ताराचंद नाना शेजवळ (लोकक्रांती सेना पक्ष)

सतिश मोगल गायकवाड (२)

किरण भानुदास बोरुडे

अशोक बबन गुंजाळ

साहिल नानासाहेब शेजवळ

सौ. कोमल किरण बोऱ्हाडे (भाजप)

कोमल संग्राम बनसोडे (शिवसेना उबाठा)

सौ. माधुरी अविनाश शेजवळ (काँग्रेस)

सौ. नम्रता मनोज जाधव (लोकक्रांती सेना पक्ष)

सौ. पौर्णिमा उमेश शेजवळ

सौ. वर्षा विशाल कोते

निकिता बाजीराव बोरुडे

---

प्रभाग क्रमांक ७

योगेश बबनराव गोंदकर (भाजप)

विजय सोपानराव जगताप

अमित कैलासराव शेळके

प्रकाश मच्छिंद्र गोंदकर

ऋतुराज रमेश गोंदकर

सौ. अनिताताई विजयराव जगताप (शिवसेना शिंदे गट)

सौ. ताराबाई सिद्धेश्वर वाकचौरे (लोकक्रांती सेना पक्ष)

सौ. रश्मी रमेश कोते

सौ. सरिता गणेश सोनवणे

---

प्रभाग क्रमांक ८

रवींद्र पांडुरंग गोंदकर (भाजप)

साईराज रमेश कोते

मेहमूद दिलदार सय्यद

अनिल रमेश कोते

सुनील रमेश कोते

भारत छगनराव शिंदे

सुलेमान शौकतअली सय्यद

गौरव राजेंद्र जाधव

सौ. मनीषा शिवाजी गोंदकर (भाजप)

सौ. छाया पोपट शिंदे

सौ. रश्मी रमेश कोते

सौ. गीता सोमनाथ कावळे

अमीना दिलदार सय्यद

---

प्रभाग क्रमांक ९

दीपक रमेश गोंदकर (राष्ट्रवादी अजितदादा गट)

विराट बाबू पुरोहित (लोकक्रांती सेना पक्ष)

राजू सादिक शेख (वंचित बहुजन आघाडी) (२)

अभिषेक सुरेश शेळके

रफिक युनुस शेख

सौ. अलका वाल्मीक गोतीस (राष्ट्रवादी अजितदादा गट)

सौ. शोभा राजेंद्र निकम (लोकक्रांती सेना पक्ष)

---

प्रभाग क्रमांक १०

नितीन पाराजी कोते (भाजप)

दत्तात्रय शिवाजीराव कोते

सौरभ विठ्ठल हाडवळे (काँग्रेस)

रोहित मनोहर सोलंकी (लोकक्रांती सेना पक्ष)

राहुल रवींद्र ठोंबरे (वंचित बहुजन आघाडी)

प्रदीप बापूसाहेब कोते

प्रभाकर धोंडीराम गीते

अशोक भगवान उगले

गणेश मधुकर साळवे

सौ. वैशाली दत्तात्रय कोते (भाजप)

सौ. सुरेखा दत्तात्रय कोते

सौ. संगीता साईनाथ बनकर

सौ. लता बापूसाहेब कोते

सौ. सोनाली प्रशांत कवडे (लोकक्रांती सेना पक्ष)

---

प्रभाग क्रमांक ११

अरविंद सुखदेव कोते (भाजप)

संभाजी नानासाहेब चौगुले (काँग्रेस) (२)

प्रशांत भागवत कोते

अंबादास गंगाधर आसने

दत्तात्रय अंबादास आसने

सौ. छाया सुधीर शिंदे (भाजप)

सौ. प्रतीक्षा किरण कोते (भाजप)

सौ. आरती संभाजी चौगुले (काँग्रेस) (२)

सौ. वृषाली राहुल गोंदकर (शिवसेना शिंदे गट) (३)

सौ. सोनाली प्रशांत कोते

सौ. अर्चना भागवत कोते

सौ. लक्ष्मी दत्तात्रय आसने

सौ. शोभा दिलीप कोते

सौ. सुरेखा दत्तात्रय कोते

सौ. रुपाली किरण वाघे

एकूणच, शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ मुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक पक्ष, अनेक गट, पारंपरिक घराणी, नवे तरुण चेहरे, महिलांची भक्कम उपस्थिती आणि १३२ नगरसेवकांसह ११ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशा बहुरंगी स्पर्धेमुळे ही निवडणूक विशेष ठरणार आहे.

आता सर्वांचे लक्ष प्रचाराच्या धुरळ्याकडे आणि त्यानंतर शिर्डीचा सजग मतदार राजा नेमका कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकतो, याकडे लागले आहे.
close