shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचा सातारा येथे जोरदार शुभारंभ

 विविध मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून स्पर्धेस सुरुवात

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

सातारा: दि. १२/ सातारा येथे आज दि. 12 /11 /2025 रोजी राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. हा उद्घाटन सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आला. हा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यावेळी उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे मा. पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी साहेब उपस्थित होते. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नितीन तारळकर सर, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या संस्कृती विकास मोरे मॅडम, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी सायली केरपाळी, क्रीडा कार्यकारी अधिकारी पुजा पडोळे (पुणे बालेवाडी मुख्यालय) इं. उपस्थित होते.

तसेच राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री चंद्रप्रकाश होणवडजकर (जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड) व राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. निलकंठ श्रावण (जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली) हे दोघे तांत्रिक समिती सदस्य म्हणून उपस्थित होते.

तसेच सातारा जिल्हा ऑफिसचे क्रीडा अधिकारी अक्षय मारकड, रवी पाटील, स्नेहल शेळके, राज्य क्रीडा मार्गदर्शक सुमित पाटील, क्रीडा कार्यकारी अधिकारी सुनील कोनीवाडकर यांनीही यावेळी उपस्थिती दाखवली. 

या स्पर्धेस कै. शरदराव शंकरराव चव्हाण क्रीडा संकुल सातारा तसेच कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तसेच यावेळी सातारा जिल्हा चेस असोसिएशनचे खजिनदार श्री मनोजकुमार तपासे यांचीही उपस्थिती लाभली.

या स्पर्धेत एकूण २४० स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून, विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना आपल्या रणनीती, बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे.

या स्पर्धेत पंच म्हणून कार्यभार मुख्य पंच (Chief Arbiter) इंटरनॅशनल आर्बिटर श्री शार्दूल तपासे, उपमुख्य पंच (Deputy Chief Arbiter) इंटरनॅशनल आर्बिटर सौ. श्रद्धा विंचवेकर हे पाहणार आहेत. तसेच फिडे आर्बिटर योगेश रवंदळे, फिडे आर्बिटर यश लोहाणा, सीनियर नॅशनल आर्बिटर अपर्णा शिंदे, सीनियर नॅशनल आर्बिटर रोहित पोल, सीनियर नॅशनल आर्बिटर महादेव भोरे, आणि स्टेट आर्बिटर ओंकार ओतारी हे पंच म्हणून काम पाहणार आहेत.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवक म्हणून अंकिता शिंदे, आयुषी बारटके, अपूर्व देशमुख, अंजली जाधव, आशीष मालपाणी, राहुल घाटे, राघव डांगे, प्रदीप पाटील (SNA), अनुराज रासकटला (SNA), गौरव म्हांगडे, यश गोडबोले, आणि इशाद शेख हे काम पाहणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन खूपच व्यवस्थित रित्या केलेले दिसुन येत आहे.

या स्पर्धेला सातारा जिल्हा चेस असोसिएशन तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांचे सहकार्य लाभले असून, हा उपक्रम जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाच्या प्रसारासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे.

सदर स्पर्धा तीन दिवस चालणार आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या स्पर्धकांची व त्यांच्या सोबत आलेल्या पालकांची आयोजकांमार्फत योग्य प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी आलेल्या पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून आयोजकांची स्तुती करण्यात येत आहे.
close