प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. १२/ संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय सोलापूर यांच्या वतीने शाळा संवेदीकरण 2025 / 2026 समुपदेशन कार्यक्रम संपन्न झाला.
कुर्डूवाडी येथील संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय मध्ये इयत्ता 9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातर्फे समुपदेशन करण्यात आले. याप्रसंगी कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालय मधील डॉ. कमरगणी तांबोळी हे मुख्य समुपदेशक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना एड्स रोगाची लक्षणे व कारणे तसेच होणारे परिणाम व त्यावरती उपाय विद्यार्थ्यांना उत्कृष्टरित्या समजावून सांगितले व भविष्यामध्ये याबद्दल घ्यावयाची काळजी याबद्दल विद्यार्थ्यांना आवाहन केले. यावेळी ग्रामीण रुग्णालय कुर्डूवाडी येथील त्यांचे सहकारी श्री राजेंद्र कांबळे उपस्थित होते. प्रशालेतर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी प्रशालेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या भविष्यकाळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या या समुपदेशन कार्यक्रमाचा निश्चितच फायदा होईल असे मत यावेळी सर्व उपस्थितांनी व मान्यवरांनी व्यक्त केले.

