shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री कमला भवानी मंदिर जीर्णोद्धारासाठी कालिंदी औदुंबर जाधव यांच्या कडून ५१०००/ ₹. देणगी कमला भवानी चरणी अर्पण


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ११/ करमाळा येथील श्री कमला देवी मंदिर जीर्णोद्धारासाठी दि. ११/११/२०२५ रोजी कालिंदी औदुंबर जाधव रा. करमाळा यांच्याकडून ५१०००/ ₹ देणगी श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन कामस प्राप्त झाली. यावेळी श्री कमला देवी मंदिर समितीकडून सौ. कल्पना दादासाहेब पुजारी, रामदास सोरटे, भारत सोरटे, व्यवस्थापक अशोक गाठे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कालिंदी जाधव, निवृत्त पोलीस उपायुक्त श्री अभय शंकरराव येवले, छाया अरुण सूर्यवंशी, मानकरी, सेवेकरी, भक्तगण इं. उपस्थित होते.

श्री कमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे. श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन  व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.

श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती पथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट करमाळा यांचे कडून करण्यात आलेले आहे. तसेच ऑनलाईन देणगीची सुविधाही उपलब्ध आहे.

देणगीसाठी संपर्क:- अशोक गाठे व्यवस्थापक. मो. नं. ९४०४७०८९२४ / ९५७९९६१७७४.
close