🥳!! कुर्यात सदा मंगलम !!🚩
चिदंबर महास्वामी कल्याणोत्सवासाठी भाविकांना निमंत्रण....🎉🎊✨🥳🧡🚩
शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,
दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार ता. २५/११/२०२५
अहिल्यानगर (राहुरी) : श्रीक्षेत्र देसवंडी (ता. राहुरी) येथे बुधवार, दिनांक 26 नोव्हेंबर, सायं. 6.00 वाजता या गोरज मुहूर्तावर चिदंबर महास्वामींचा भव्य कल्याणोत्सव (विवाह सोहळा) धार्मिक उत्साहात पार पडणार आहे. दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा अशी असेल ......
🚩व्याहीभेट – 1.00 दुपारी
🚩हळद – 2.00 दुपारी
🚩भव्य मिरवणूक – 3.00 दुपारी
🚩विवाहसोहळा – 6.00 सायं. (गोरज मुहूर्त)
कार्यक्रम प्रसंगी शिव चिदंबर लाईट्स, शिव चिदंबर ऑडिओ, माऊली बॅन्जो (कळवण), जागतिक रेकॉर्ड रांगोळी, तसेच घोडेसवारीची असे विविध रंगी आकर्षक मिरवणूक विशेष भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आलेले आहे.
या पवित्र सोहळ्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच चिदंबर भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गुरुवर्य श्री.अमित कुलकर्णी आणि चिदंबर भक्त परिवार देसवंडी, कौठा (ता -नेवासा), टाकळीमिया, वाघोली (ता. शेवगाव), तांभेरे, वांबोरी, चांदा(ता-नेवासा), करजगाव, वैजुबाभुळगाव (ता. पाथर्डी), अहिल्यानगर यांनी केले आहे.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

