अकोले ( प्रतिनिधी ) कळस गावची सुकन्या डॉ. पूर्विता वाकचौरे हिच्या नेतृत्वाखालील टीम ने कमी वेळात सर्वाधिक दंत तपासणी चे जागतिक रेकॉर्ड केले असून याची दखल ऑक्सर बुक रेकॉर्ड ने घेतली आहे.
कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे आयोजित या जागतिक रेकॉर्ड साठी 7 तासात 50,000 दंत तपासणी चे उद्दिष्ट असताना या टीमने 56,600 व्यक्तींची दंत तपासणी केली. या मध्ये 90 ठिकाणी कॅम्प आयोजित केले होते त्यामध्ये 100 दंत डॉक्टर यांनी सहभाग घेतला होता. या सर्व टीमचे नेतृत्व डॉ. पूर्विता वाकचौरे हिने केले.
डॉ. पूर्विता वाकचौरे हिला कामगिरी बद्दल ऑक्सर बुक रेकॉर्ड ने शानदार समारंभात सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
डॉ.पूर्विता वाकचौरे हि जिल्हा परिषद चे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांची कन्या आहे. तिचे वैद्यकीय शिक्षण डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे इथे झाले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे.

