अहिल्यानगर: प्रतिनिधी
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री बापुसाहेब रामदास गागरे वय - 39 वर्षे रा.तांभोरे ता. राहुरी जि.अहिल्यानगर हे दिनांक 13/10/2025 रोजी त्यांचे घरातुन ड्रायव्हरला घेणेकामी वाकडी ता.राहाता येथे जात असतांना एक पांढ-या रंगाची चारचाकी वाहनाने पाठलाग करुन निळवंडे कॅनलच्या जवळ फिर्यादीस हत्याराचा धाक धाकवुन जिवे ठार मारण्याची धमकी देवुन बळजबरीने गाडीमध्ये बसवुन घेवुन जावुन एका निर्जळ ठिकाणी असलेल्या गोडाऊनमध्ये घेवुन जावुन फिर्यादीस मारहाण करुन दहा लाखाची खंडणी मागितली तेव्हा मी त्यांनी पैसे देतो असे सांगितले असता त्यांनी फिर्यादीच्या डोळ्याला पट्टी बांधुन आरोपीकडील चारचाकी वाहनात बसवुन फिर्यादीस शनिशिंगणापुर फाट्याजवळ सोडुन दिले. व त्यानंतर आरोपीतांनी फिर्यादीस फोन करुन खंडणीचे पैसे कधी देणार आहे. जर तु पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मारुन टाकु अशी धमकी दिली आहे. याबाबत राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1163/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 140(2), 308(3)(4)(5), 115(2), 351(2), 352, 3(5) प्रमाणे अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, रमिजराजा आत्तार, प्रशांत राठोड, विशाल तनपुरे, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत, चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.
दिनांक 17/11/2025 रोजी वरील पथक तांत्रिक विश्लेषण व व्यावसायिक कौशल्याचा आधारे माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा हा संशयीत इसम नामे ओम अशोक ठोंबरे व अजय शंकर हुलावळे यांनी त्यांच्या साथीदारासह केला असुन ते कोथरुड पुणे येथे आहेत. पथकाने तात्काळ कोथरुड पुणे येथे जावुन आरोपीतांचे शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नांव 1) ओम अशोक ठोंबरे, वय 20 वर्षे, हल्ली रा. सुतारदरा, ÛúÖê£Ö¹›, ता. हवेली, जि.पुणे, मुळ रा. देवगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, 2) अजय शंकर हुलावळे, वय 21 वर्षे, रा. सुतारदरा, ÛúÖê£Ö¹›, ता. हवेली, जि.पुणे, 3) सोन्या उर्फ आदित्य रावसाहेब गागरे, वय 19 वर्षे, रा. तांभेरे, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर, 4) साई परमेश्वर ढवळे, वय 18 वर्षे, रा. भेंडा, ता. नेवासा, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले त्यांचेकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी करता अजय शंकर हुलावळे याने सदरचा गुन्हा 5) रामेश्वर उर्फ राया ´ÖÖ¹ŸÖߨœüÝÖêü, रा. ÛúÖê£Ö¹›ü, जि.पुणे,(फरार) 6) रोहित रुईकर रा. भेंडा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर (फरार) यांचेसह अपहरण करुन खंडणी मागणी केल्याची कबुली दिली आहे. आरोपीचे सांगणेवरुन 1,19,200/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपी नामे 1) ओम अशोक ठोंबरे, वय 20 वर्षे, हल्ली रा. सुतारदरा, ÛúÖê£Ö¹›, ता. हवेली, जि.पुणे, मुळ रा. देवगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, 2) अजय शंकर हुलावळे, वय 21 वर्षे, रा. सुतारदरा, ÛúÖê£Ö¹›, ता. हवेली, जि.पुणे, 3) सोन्या उर्फ आदित्य रावसाहेब गागरे, वय 19 वर्षे, रा. तांभेरे, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर, 4) साई परमेश्वर ढवळे, वय 18 वर्षे, रा. भेंडा, ता. नेवासा, जि.अहिल्यानगर यांना राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1163/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 140(2), 308(3)(4)(5), 115(2), 351(2), 352, 3(5) गुन्ह्याचे तपासकामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

