अहिल्यानगर, दि. १९ नोव्हेंबर २०२५ (बुधवार)
: .एन. एम. सथा फार्मसी कॉलेज, अहिल्यानगर येथे ,आयोजित मूल्यवर्धन ३.० प्रशिक्षणाचा समारोप संपन्न झाला. या प्रसंगी स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या मुख्याध्यापक सेलचे *जिल्हाप्रमुख श्री. अमोल* *क्षीरसागर सर* यांनी आपले मनोगत व्यक्त करत प्रशिक्षणाचे कौतुक केले.
हे प्रशिक्षण गेल्या १२ दिवसांपासून चालू असून याचे आयोजन शांतीलालजी मुथा सोशल फाऊंडेशन आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
प्रशिक्षणात सहभागी मानकरी सुलभकांनी
अभ्यासपूर्व तयारी,
उपक्रमशील व आकर्षक सादरीकरण,
व्यवहार्य कौशल्य विकास,
या माध्यमातून शिक्षक व मुख्याध्यापकांना उपयोगी व प्रभावी मार्गदर्शन केल्याचे क्षीरसागर सरांनी सांगितले.
या प्रशिक्षणात योगदान देणारे सुलभक शिक्षक:
श्री. अमेय कानडे सर
श्री. सचिन कराळे सर
श्री. अमोल शिंदे सर
श्री. रितेश गोरे सर
सौ.रसिका देवचके मॅडम
श्रीम. वर्षा कोकाटे मॅडम
श्रीम. अनिता पठारे मॅडम
सौ. अनिता तिवारी मॅडम
श्री. आदिनाथ पवार सर
सौ. वृषाली कुलकर्णी मॅडम
सौ. जयश्री लांडे मॅडम यांचे सरांनी भरभरून कौतुक केले!
क्षीरसागर सरांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व *प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र* लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्यावतीने केली, जेणेकरून प्रशिक्षणार्थी शिक्षकांना समाधान आणि प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले.
या प्रशिक्षणाचे नियोजन *केंद्रप्रमुख श्री.* *अरुण पालवे* सरांच्या कुशल मार्गदर्शनातून झाल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम रेखीव, शिस्तबद्ध व परिणामकारक पार पडल्याचेही त्यांनी गौरविले.
समाजातील बदलत्या परिस्थितीत शिक्षकांनी केवळ ज्ञान देण्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये नीतिमूल्ये, चारित्र्य, समजूतदारपणा आणि सजग नागरिकत्व विकसित करणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
समारोपा प्रसंगी मुख्याध्यापक सेलच्यावतीने —
आयोजन संस्थांचे अभिनंदन करण्यात आले; त्यामध्ये, एन. एम. सथा फार्मसी कॉलेजचे *प्राचार्य डॉ. विशाल पांडे सरांचे* विशेष आभार व्यक्त करण्यात आले!
सर्व सुलभक बंधू-भगिनींचे कौतुक करण्यात आले! स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला! प्रशिक्षणार्थी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले!
मूल्यनिर्मितीद्वारे शिक्षण अधिक प्रभावी, सुदृढ व मानवतावादी बनवण्याच्या दिशेने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरेल, असे क्षीरसागर सरांनी शेवटी सांगितले. कार्यक्रमाचे *छायाचित्रन* *श्री राहुल मोरे सरांनी * केले तर *सूत्रसंचालन श्री.प्रशांत कुलकर्णी* सरांनी अतिशय सुंदर केले .

