नगर प्रतिनिधी:
शिर्डी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची धामधूम सुरू झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी कल्याणी विठ्ठल आरणे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होताच शहरातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. त्यांच्या साधेपणा, शांत स्वभाव आणि सातत्यपूर्ण समाजकारणामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा रंगू लागली आहे. उमेदवारीनंतर महिलांपासून ज्येष्ठ नागरिक, व्यापारी ते युवकांपर्यंत सर्व स्तरांतून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
साधेपणातून उभं राहिलेलं समाजकारण,
कल्याणी आरणे यांची ओळख ही बडेजाव टाळून शांत, संयमी आणि सेवाभावी कार्यकर्ती अशी आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रवास एका दिवसात घडलेला नाही; अनेक वर्षांच्या लोकसंपर्कातून आणि सातत्यपूर्ण जनसेवेतून त्यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, तसेच रस्ते-विकास यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे.
त्यांची प्रतिमा “नेतिक, प्रामाणिक आणि लोकांपर्यंत पोहोचणारी” अशी तयार झाल्याने सामान्य नागरिक त्यांना मनापासून स्वीकारत आहेत.
शहरविकासाचे आव्हान आणि आरणे यांची बांधिलकी,
शिर्डी शहराची वाढ झपाट्याने होत असताना मूलभूत गरजाही वाढल्या आहेत. अनेक प्रभागांत पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्त्यांचे नूतनीकरण, पथदिवे, कचरा व्यवस्थापन यांसारख्या विषयांची गंभीरता नागरिकांनी सातत्याने व्यक्त केली आहे.
कल्याणी आरणे यांनी नगराध्यक्ष म्हणून शहरातील सर्वांगीण विकासाचा संकल्प केला असून, सुशासन आणि उत्तरदायी व्यवस्थापन यावर त्यांनी भर दिला आहे. “विकासाला गती, आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता” हे त्यांचे सूत्र असल्याचे नागरिक सांगतात.
महिला आणि युवक वर्गाचा भक्कम पाठिंबा,
महिलांचे आरोग्य, त्यांचे स्वावलंबन, सुरक्षितता आणि शिक्षण या विषयांवर कल्याणी आरणे यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. स्वयंसहायता गटांशी केलेला संवाद, महिलांसाठी आयोजित विविध कार्यक्रम, तसेच युवकांना रोजगाराभिमुख मार्गदर्शन या उपक्रमांमुळे त्यांच्याविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
त्यांच्या उमेदवारीमुळे महिला वर्गात विशेष उत्साह आणि आशावाद निर्माण झाला आहे.
बाबूजी पुरोहित व विराट पुरोहित यांचे समर्थ मार्गदर्शन,
आदरणीय बाबूजी शिवराम पुरोहित व माननीय विराट पुरोहित यांचे भक्कम मार्गदर्शन आणि पाठिंबा सौ. कल्याणी आरणे यांना लाभला आहे. विराट पुरोहित यांचा दांडगा अनुभव आणि सौ. कल्याणी आरणे यांचा जमिनीशी जोडलेला स्वभाव — या दोन्हींच्या संयोगामुळे त्यांची उमेदवारी अधिक सक्षम ठरल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. नेतृत्वाच्या पाठिंब्यामुळे प्रचारात मोठी आघाडी घेतली जात आहे.
"लोकसेवक म्हणून काम करणार!" — कल्याणी आरणे,
उमेदवारीनंतर नागरिकांना दिलेल्या प्रतिसादात त्या म्हणाल्या, शिर्डी शहरातील प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते, सुबक शहररचना — हे नागरिकांचे हक्क आहेत. या शहराची सेवा करणे ही माझ्यासाठी पदापेक्षा मोठी जबाबदारी आहे. मी लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर लोकसेवक म्हणून काम करणार आहे.
बापूजी आणि विराट पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

