उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत मोर्शी अंतर्गत शहरामध्ये दि 17 नोव्हेंबर 2025 पासून कुष्ठरोग शोध अभियानाला रुग्णालयाचे .मा वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेश जयस्वाल तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन कोरडे यांचे मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत मोर्शी शहरामध्ये दिनांक 17 नोव्हेंबर 2025 ते 2 डिसेंबर 2025 या काळामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत कुष्ठरोगाबाबत घरोघरी आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे यामध्ये कुष्ठरोगाची सर्वसामान्य लक्षणे म्हणजेच फिक्कट किंवा लालसर चट्टा, तेलकट गुळगुळीत व चमकदार चेहरा, कानाच्या जाड पाड्या होणे, हातापायाच्या बोटामध्ये मुंग्या येणे, बधिरता किंवा अशक्तपणा येणे तसेच या आजाराबाबत कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन कुष्ठरोग तंत्रज्ञ निळकंठ ठवळी यांचे मार्फत करण्यात येत आहे
यावेळी रुग्णालयाचे कर्मचारी विनय शेलूरे, प्रकाश मंगळे, प्रशांत बेहरे, आशिष पाटील, रियाज खान, रामेश्वर नागपूरकर, ऋषिकेश दहेकर, नंदू थोरात तसेच पावडे नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.

