*राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा 2025-26 उत्साहात संपन्न; मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी संस्कृती विकास मोरे यांचे कौतुकास्पद आयोजन*
प्रतिनिधी : सूर्यकांत होनप
सातारा: दि. १६/ क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या 2025-26 राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या. सदर स्पर्धा सातारा शहरात कला व वाणिज्य महाविद्यालय येथे दिनांक 12 ते 14 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पार पडल्या. या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन ताराळकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धा प्रमुख म्हणून बुद्धिबळ खेळाडू मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी संस्कृती विकास मोरे (शिवछत्रपती विजेत्या), क्रीडा अधिकारी रवी पाटील, अक्षय मारकड, स्नेहल शेळके, कोमल गोळे यांनी काम पाहिले. मुख्य पंच म्हणून (Chief Arbiter) इंटरनॅशनल आर्बिटर श्री शार्दूल तपासे, उपमुख्य पंच (Deputy Chief Arbiter) इंटरनॅशनल आर्बिटर सौ. श्रद्धा विंचवेकर यांनी काम पाहिले. तसेच फिडे आर्बिटर योगेश रवंदळे, फिडे आर्बिटर यश लोहाणा, सीनियर नॅशनल आर्बिटर अपर्णा शिंदे, सीनियर नॅशनल आर्बिटर रोहित पोल, सीनियर नॅशनल आर्बिटर महादेव मोरे, आणि स्टेट आर्बिटर ओंकार ओतारी हे सर्व पंच यांच्या सहकार्याने उत्तमरीत्या या स्पर्धेत चांगली चुरस पाहायला मिळाली.
सर्व पालक व चेस खेळाडू यांनी पूर्ण स्पर्धेच्या नियोजनाबाबत चांगले समाधान व्यक्त केले व आयोजकांचे कौतुक केले. ही स्पर्धा निर्विवाद रित्या पार पडण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांचे अधिकारी व चेस असोसिएशन सातारा चे सदस्य या सर्वांनी खूप मेहनत घेतली. हा उपक्रम जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाच्या प्रसारासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरलेला आहे.
या प्रसंगी मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी सायली केरपाळी, क्रीडा कार्यकारी अधिकारी पुजा फडोळे (पुणे बालेवाडी मुख्यालय) इं. उपस्थित होते. तसेच राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री चंद्रप्रकाश होणवडजकर (जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड) व राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. निलकंठ श्रावण (जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली) हे तांत्रिक समिती सदस्य म्हणून उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन सातारा जिल्ह्याचे एस. पी. तुषार दोशी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. कला व वाणिज्य महाविद्यालयाचे अध्यक्ष जयेंद्र चव्हाण सर, यशोदा शिक्षण संस्थेचे प्रमुख श्री अजिंक्य सगरे सर, सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई देशपांडे, PSI सुवर्णा काटकर, कोल्हापूर विभागीय शारिरीक शिक्षण शिक्षक महासंघ माजी चेअरमन आर. वाय. जाधव सर, सामाजिक कार्यकर्ते जयंत देशपांडे अशा विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी स्पर्धेत उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तसेच यावेळी सातारा जिल्हा चेस असोसिएशनचे खजिनदार श्री मनोजकुमार तपासे यांचीही उपस्थिती लाभली. या सर्वांच्या निरीक्षणाखाली ही स्पर्धा उत्तम रित्या पार पडली.
यशोदा शिक्षण संस्थेचे प्रमुख श्री अजिंक्य सगरे सर यांनी स्वता: 14 वर्षाखालील गटातील दहा यशस्वी खेळाडूंना ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
17 वर्षाखालील गटातील मुलांना पैलवान निशांत धनाजी जाधव दहिवडी यांच्या कडून ट्रॉफी देण्यात आली.
19 वर्षाखालील गटातील मुलांना व सर्व पंच यांना श्री ब्रह्मचैतन्य ट्रेडिंग कंपनी, सांगली यांच्याकडून ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच सर्व मुलांना मेडल्स मलाबार गोल्डस अँन्ड डायमंड यांच्याकडून देण्यात आली. या सर्वांचे आयोजकांकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
एकूण सहा गटात प्रथम पाच क्रमांकाचे खेळाडू ज्यांनी प्राविण्य मिळवले असे एकूण 30 गटनिहाय निकाल खालील प्रमाणे आहेत.
14 वर्षाखालील मुलांमध्ये:- प्रथम क्रमांक शाश्वत गुप्ता, द्वितीय क्रमांक सिद्धार्थ बांग, तृतीय क्रमांक आर्यन वाघमारे, चतुर्थ क्रमांक मरास सिंग, पाचवा क्रमांक लिमये कवीश.
14 वर्षाखालील मुलींमध्ये:- प्रथम क्रमांक घाटे तन्मयी, द्वितीय क्रमांक परदेशी चतुर्थी, तृतीया क्रमांक सानवी गोरे, चतुर्थ क्रमांक गांधी परिधी, पाचवा क्रमांक भावा प्रणिता.
17 वर्षाखालील मुलांमध्ये:- प्रथम क्रमांक गायकवाड मानस, द्वितीय क्रमांक चित्रे आरुष, तृतीय क्रमांक शरणार्थी वीरेश, चतुर्थ क्रमांक घाडगे हर्ष, पाचवा क्रमांक सोनि अथर्व.
17 वर्षाखालील मुलींमध्ये:- प्रथम क्रमांक सानि देशपांडे, द्वितीय क्रमांक श्रेया हिप्परगी, तृतीया क्रमांक सई पाटील, चतुर्थ क्रमांक बजाज श्रद्धा, पाचवा क्रमांक मानकर वैष्णवी.
19 वर्षाखालील मुलांमध्ये:- प्रथम क्रमांक कदम अर्णव, द्वितीय क्रमांक आयर अरविंद, तृतीया क्रमांक रबागवे गौरंग, चतुर्थ क्रमांक वडके सुयोग, पाचवा क्रमांक पाटील सुधीप.
19 वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम क्रमांक उंडाळे श्रावणी, द्वितीय क्रमांक काळे श्रुती, तृतीया क्रमांक गावंडे देवांशी, चतुर्थ क्रमांक अनुष्का कुतवळ, पाचवा क्रमांक पाटील दिव्या
हे खेळाडू आपापल्या वयोगटातील राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. या सर्वांचे सर्व स्तरातून व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे.
सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी संस्कृती विकास मोरे व मुख्य पंच शार्दुल तपासे यांनी खूप मेहनत घेतली.

